नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली. असे असले तरी देशाची आर्थिक स्थिती स्थिर राहण्यासाठी काही आस्थापनांना काम सुरु करण्याची परवानगी देणे महत्वाचे होते. या अनुशंगाने २० एप्रिलपासून काही कार्यालय सुरु राहणार आहेत. काही उद्योगधंदे देखील सुरु राहणार आहेत. पण सरकारने यांना देखील नियम आखून दिले आहेत. तुम्ही देखील २० एप्रिलपासून ऑफिसला जाणार असाल तर या ११ गोष्टींचे पालन तुम्हाला करावं लागणार आहे.
मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. मास्क हे अनिवार्य आहे. ते नसल्यास तुमच्याविरोधात कारवाई होऊ शकते.
जर तुमच्याकडे मास्क नसेल तर स्वच्छ कापडाचा उपयोग करु शकता.
घरातून बाहेर पडताना साबण किंवा सॅनिटायझर सोबत ठेवा.
रस्त्यात कोणत्याही वस्तूला शिवू नका. चुकून जरी हात लागला तर हात स्वच्छ धुवा.
किमान २० सेकंद तरी हात धुवत राहा. यामुळे वायरस शरीरापर्यंत पोहोचणार नाही.
घरातून बाहेर पडल्यापासून माणसांमध्ये अंतर ठेवा. कार्यालयात देखील सहकार्यांपासून अंतर ठेवा.
सर्दी-खोकला असल्यास घरातून बाहेर पडू नका. कार्यालयात ही समस्या झाली तर तोंड चहुबाजून झाकून घ्या. या दरम्यान तुम्ही जे कापड वापराल ते पुन्हा वापरु नका.
चेहऱ्याला वारंवार हात नका लावू.
घरी परतल्यावर हात आणि तोंड स्वच्छ धुवा. त्यानंतरच परिवारातील सदस्यांना भेटा.
कार्यालयात जाण्यासाठी जे वाहन वापराल ते स्वच्छ ठेवा.
जर बाईकने जात असाल तर कोणत्या व्यक्तीला मागे बसवू नका. कारमध्ये २ व्यक्ती बसू शकतात. दुसरा व्यक्ती मागच्या सीटवर बसायला हवा.