काश्मीरमध्ये CRPFच्या पथकावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

अचानकपणे गोळीबार सुरु झाल्याने दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. 

Updated: Apr 18, 2020, 06:54 PM IST
काश्मीरमध्ये CRPFच्या पथकावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद title=

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या सोपोर परिसरात शनिवारी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) चौकीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात CRPF चे दोन जवान शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, येथील नूरबाग परिसरात असणाऱ्या CRPF आणि स्थानिक पोलिसांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. अचानकपणे गोळीबार सुरु झाल्याने दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी एसडीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. सध्या या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी नूरबाग परिसरात शोध मोहीम राबवण्यात येत आहे.

पाकचं शेपुट वाकडंच; पुंछ सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा

काही दिवसांपूर्वीच भारतीय लष्कराने काही दिवसांपूर्वीच पाकव्याप्त काश्मीरच्या दुधनियाल परिसरातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. गेल्या काही काळापासून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी या तळाचा सातत्याने वापर केला जात होता. तर  १ एप्रिल रोजी केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांनाही भारतीय जवानांनी कंठस्नान घातले होते.