पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, IMPS च्या नियमात बदल

IMPS Money Transfer : तुम्ही जर ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण उद्यापासून म्हणजेच 1 फेब्रुवारी IMPS च्या नियमात बदल होणार आहे. नेमका हा बदल काय असणार आहे ते जाणून घ्या... 

श्वेता चव्हाण | Updated: Jan 31, 2024, 04:01 PM IST
पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, IMPS च्या नियमात बदल  title=

IMPS Money Transfer Rule : गल्लीत येणारा भाजी विक्रेता असू किंवा मॉलमध्ये खरेदी असू ग्राहक आता कुठेही ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असतो. जर तुम्ही पण ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता तुम्ही फक्त 1 किंवा 2 लाख रुपये नाही तर 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाइन सहज पाठवू शकता. यासाठी तुम्हाला IMPS (इमीडिएट पेमेंट सर्विस) चा वापर करावा लागला आहे. त्यासाठी तुमच्या फोन बँकिंग किंवा नेट बँकिंगशी जोडावं लागेल. तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव आणि मोबाईल नंबर तुमच्याकडे असेल तर तुमचे काम सोपे देखील होऊ शकतं. 

सध्या IMPS ने मोठी रक्कम पाठवण्यासाठी लाभार्थीचे नाव, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकणे आवश्यक आहे. या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो. परंतु नवीन नियम लागू झाल्यानंतर तुम्हाला एवढी मोठी प्रक्रिया करावी लागणार नाही. यासाठी तुम्ही बँक खात्यात नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि नावाद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करु शकता. 

1 फेब्रुवारीपासून IMPS च्या नियमात बदल 

यासाठी NPCI ने 31 ऑक्टोबर रोजी परिपत्रक जारी केले असून 1 फेब्रुवारीपासून IMPS चे नियमही बदलले जाणार आहेत. या आधारावर कोणतीही व्यक्ती, त्याचे नाव काहीही असो, कोणत्याही लाभार्थीला 5 लाख रुपयांपर्यंतचा निधी हस्तांतरित करू शकतो. सध्या लाभार्थी तपशील जोडले जात नाही तोपर्यंत निधी हस्तांतरित केला जाऊ शकत नाही.

याचे फायदे काय होतील?

तुम्ही फक्त बँक खातेधारकाचा मोबाईल नंबर जोडून एका खात्यातून दुसऱ्या खात्यात 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करू शकता. साहजिकच, तुम्हाला लाभार्थीचे नाव देण्याची आवश्यकता असू शकते, परंतु तुम्ही किचकट प्रक्रियेद्वारे आणि कमी वेळेत सहजपणे मोठ्या प्रमाणात पैसे हस्तांतरित करू शकाल.

असे IMPS द्वारे पैसे कसे पाठवू शकता?

- तुमचे मोबाइल बँकिंग ॲप उघडा.

- तुम्हाला मुख्य पृष्ठावर जाऊन 'फंड ट्रान्सफर' पर्यायावर क्लिक करावे लागेल.

- पुढील प्रक्रियेसाठी निधी हस्तांतरणासाठी 'IMPS' पद्धत वापरा.

- लाभार्थीचा MMID (मोबाइल मनी आयडेंटिफायर) आणि MPIN (मोबाइल वैयक्तिक ओळख क्रमांक) प्रविष्ट करा.

- ॲपमध्ये तुम्हाला किती पैसे ट्रान्सफर करायचे आहेत ते एंटर करा.

- सर्व तपशील तपासल्यानंतर, पुढे जाण्यासाठी पुष्टी वर क्लिक करा.

- तुम्हाला एक OTP प्राप्त होईल आणि व्यवहार प्रमाणीकृत करण्यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करा.

- तुमच्या फोनवर OTP येईल आणि तो टाकून तुम्ही तुमचा व्यवहार पूर्ण करू शकता.