आसाम पुराच्या पाण्यात, १७ लाख नागरिक बाधित

आसामधली ब्रह्मपुत्रा नदीची पूरस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. दिवसभरात पुराच्या पाण्यात आणखी ५ जणं वाहून गेले. 

PTI | Updated: Jul 13, 2017, 08:49 AM IST
आसाम पुराच्या पाण्यात, १७ लाख नागरिक बाधित title=

नवी दिल्ली : आसामधली ब्रह्मपुत्रा नदीची पूरस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. दिवसभरात पुराच्या पाण्यात आणखी ५ जणं वाहून गेले. 

आसामच्या २४ जिल्ह्यात १७ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना पुराचा फटका बसलाय. ब्रह्मपुत्रा नदी आणि तिच्या उपनद्यांनी आत्तापर्यंत २५०० गावं अक्षरशः गिळंकृत केली आहेत. १ लाख ६ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालंय. 

अनेक ठिकाणचे पूल आणि रस्ते वाहून गेलेत. त्यामुळे रस्त्याने होणारं दळणवळण मोठ्या प्रमाणात ठप्प झालंय. पुरामुळे आत्तापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झालाय. 

आसामच्या जगप्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा ७५ टक्क्यांहून अधिक भाग पाण्याखाली आलाय. उद्यानातल्या गेंड्यासह काही प्राण्यांनी उद्यानातले उंचवटे, टेकड्या यांवर आश्रय घेतलाय.