इनोव्हा कार आणि 11 लाखांसाठी महिलेला All Out पाजले, पतीनेच रचला होता कट

Delhi Crime News: महिलेने माहेरच्याकडून हुंडा आणण्यास नकार दिल्यावर सासरच्या मंडळीने तिला ऑलआऊट जबरदस्ती ऑल आऊट पाजण्याचा प्रयत्न केला.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 17, 2023, 04:37 PM IST
इनोव्हा कार आणि 11 लाखांसाठी महिलेला All Out पाजले, पतीनेच रचला होता कट title=
in laws gives women all out for not giving innova and rs 11 lakh in dowry

Delhi Crime News: सासरच्या मंडळींनी हुंड्यात ११ लाख आणि इनोव्हा गाडी मागितली. मात्र विवाहितेने (Husband And Wife) सासरची ही मागणी पूर्ण करण्यास ठाम नकार दिला. त्यानंतर नवविवाहितेला ऑल आऊट (All Out) पाजून ठार करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) पीडितेच्या पतीसह चार जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. (Dowry Case)

11 लाख आणि इनोव्हाची मागणी

ज्योती असं पीडितेचे नाव आहे. दिल्लातील विशाल बैसोया याच्यासोबत २०२०मध्ये तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर तिच्या सासरकडून सतत हुंड्यासाठी छळ करण्यात येत होता. लग्नात हुंडा देऊनही पुन्हा अतिरिक्त हुंडा आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. आरोपी कार व 11 लाख रोक रक्कमेची मागणी करत होते. 

महिलेच्या सासरकडून सातत्याने हुंड्याची मागणी होत होती. या रोजच्या त्रासाला वैतागून दोन्ही पक्षांकडून तीन वेळी पंचायतदेखील भरवली होती. मात्र, त्यातूनही काहीच निष्पन्न झाले नाही. त्यानंतरही आरोपी विवाहितेला सातत्याने हुंड्यासाठी छळत होते, अशी तक्रार पीडितेने दिली आहे. 

बळजबरी ऑल पाऊट पाजले

सासरच्यांना हुंडा म्हणून इनोव्हो कार आणि 11 लाख रुपये रोख हवे होते. महिलेच्या माहेराहून पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी तिला बळजबरी ऑलआऊट पाजले. त्यानंतर पीडितेची तब्येत खालावली होती. रुग्णालयात तिच्यावर योग्य उपचार झाल्यानंतरच ती पूर्णपणे बरी झाली, असं तिने तक्रारीत म्हटलं आहे. 

पोलिसांत तक्रार दाखल

पोलिसांनी महिलेच्या पतीसह तीन जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चौघांनीही अटक केली आहे. 

नवरदेवाला झाडाला बांधून ठेवले

दरम्यान, हुंडा मागणाऱ्या एका तरुणाला नवरीच्या नातेवाईकांनी झाडाला बांधून ठेवल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. वरमालाची तयारी सुरू असतानाच वर पक्ष व वधू पक्षात वाद निर्माण झाले. वाद इतके वाढले की लग्नाचा मांडवच कुस्तीचा आखाडा ठरला. दोन्ही पक्षांकडील नातेवाईकांनी एकमेकांना माराहाण करण्यास सुरुवात केली. लग्नाचे विधी सुरु असताचा नवरदेवाने व त्याच्या कुटुंबीयांनी वधुपक्षाकडे हुंड्याची मागणी केली. नवरदेवाला खूपदा समजवायचा प्रयत्न केला मात्र तो हुंड्यासाठी अडून बसला. हुंडा न मिळाल्यास लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी नवरदेवाने दिली. नवरदेवाच्या या वागण्यावर नवरीच्या नातेवाईकांचा संताप झाला. त्यांमुळ रागाच्याभरात त्यांनी नवरदेवाला झाडाला बांधून ठेवले.