नवी दिल्ली: भारतात महिलाशक्तीचा जागर जागो-जागी पाहायला मिळत आहे. महिला स्वत:च्या कर्तुत्वाच्या जोरावर समाजात आपले एक वेगळे स्थान निर्माण करत आहेत. शनिवारी 'ऑक्सफर्ड डिक्शनरीने' २०१८ सालचा हिंदी शब्द म्हणून 'नारी शक्ती' या शब्दाची निवड केली. जयपूरच्या साहीत्य महोत्सवात याची घोषणा करण्यात आली. 'ऑक्सफर्ड डिक्शनरी'नुसार 'नारी शक्ती' हा संस्कृत शब्द आहे आणि आताच्या आधुनिक युगात स्वत:च्या हिमतीने जगत असलेल्या महिलांना उद्देशून हा शब्द आहे. २०१७ मध्ये 'आधार' या शब्दाची निवड करण्यात आली होती. ऑक्सफर्डने २०१७ पासुन ही योजना आमलात आणली आहे.
देशातील महिलांचे आधिकार आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांचा असलेला मोलाचा वाटा लक्षात घेत 'नारी शक्ती'शब्दाला शब्दकोशात सामाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. ज्या दिवशी जयपूरमध्ये
'नारी शक्ती' शब्दाला शब्दकोशात सामाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याच दिवशी राजपथावर प्रजासत्ताक दिनी तीन सेनांचा समावेश असलेल्या रणरागीणिंनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत शौर्य आणि पराक्रमाची प्रचिती दिली.
ऑक्सफर्डच्या सांगण्यानुसार, देशातील महिला सबलीकरणासाठी सरकार करत असलेले प्रयत्न आणि #MeeToo चळवळीमुळे 'नारी शक्ती' शब्दाला शब्दकोशात जागा मिळाली आहे.
ऑक्सफर्डने जारी केलेल्या एका निवेदनात असे म्हटले, गेल्या वर्षभरात भारतात महिलांच्या आधिकारांवरुन अनेक तेढ आणि वाद निर्माण झाले. केंद्र सरकारने अंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत 'नारी शक्ती' पुरस्कार जाहीर केला.
सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकवर प्रतिबंध आणले तर दुसरीकडे केरळच्या सबरीमाला मंदिरात महिला प्रवेशासाठी सामाजिक लढा चालू आहे, सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास मान्याता दिली. २०१८ मध्ये लहान मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटना, या कारणांवरुन 'नारी शक्ती' शब्दाला 'ऑक्सफर्ड डिक्शनरी'मध्ये
सामाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.