खासदार आणि अभिनेते सनी देओल यांच्या सुरक्षेत वाढ

 भाजप खासदार आणि अभिनेता सनी देओल यांची सुरक्षा वाढवली.

Updated: Dec 16, 2020, 07:23 PM IST
खासदार आणि अभिनेते सनी देओल यांच्या सुरक्षेत वाढ title=

नवी दिल्ली : देशात सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे भाजप खासदार आणि अभिनेता सनी देओल यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सनी देओल यांना आता वाय श्रेणी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. सनी देओल यांच्या सुरक्षेत आता 11 सुरक्षा रक्षण तैनात करण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2 कमांडो असतील. सनी हे गुरदासपूरमधून भाजपचे खासदार आहेत.

सनी देओल यांनी ट्विटरवर शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं होतं. ज्यामुळे ते चर्चेत आले होते. 

शेतकरी आणि सरकार यांच्यातील हे प्रकरण आहे. त्यामुळे इतर लोकांनी यामध्ये पडू नये. काही लोकं याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मी माझा पक्ष आणि शेतकऱ्यांसोबत आहे. मी नेहमी शेतकऱ्यांसोबत आहे. आमच्या सरकारने नेहमी शेतकऱ्यांचा विचार केला आहे. आणि चर्चेतून तोडगा निघतो.'

सनी देओलचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सरकारला ट्विटरद्वारे, 'शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्वरित तोडगा काढण्याची विनंती केली. धर्मेंद्र यांनी ट्विट केले होते की, माझ्या शेतकरी बांधवांचे दु:ख पाहून मला खूप वाईट वाटले. सरकारने लवकरच काहीतरी केले पाहिजे.'

सनी देओल 'आप 2' सिनेमामध्ये पुन्हा एकदा वडील धर्मेंद्र, भाऊ बॉबी आणि मुलगा करण देओल यांच्यासमवेत दिसणार आहे.

याआधी सप्टेंबरमध्ये गृह मंत्रालयाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोतला मुंबईत येण्यापूर्वी वाय प्लस प्रकारासाठी सुरक्षा प्रदान केली होती. कंगनाने आपल्या एका ट्विटमध्ये मुंबईची तुलना पीओकेशी केली, यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. दोघांमधील वक्तृत्व बरेच वाढले होते. म्हणून, कंगनाला वाय प्लस प्रकारातील सुरक्षा प्रदान करण्यात आली होती.