Independence Day Medals : पोलीस पदकांची घोषणा; महाराष्ट्रातील 61 जणांची निवड, पाहा संपूर्ण यादी

Independence Day 2024 : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाच्या वतीनं शौर्य पदकांची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये सर्वाधिक 52 शौर्य पदकं CRPF च्या खात्यात गेली आहेत.   

सायली पाटील | Updated: Aug 14, 2024, 11:56 AM IST
Independence Day Medals : पोलीस पदकांची घोषणा; महाराष्ट्रातील 61 जणांची निवड, पाहा संपूर्ण यादी title=
independence day 2024 police medals for central and state forces announced know maharashtra list

Independence Day 2024 : भारताच्या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत या अतीव महत्त्वपूर्ण दिवसाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं सेवा पदकांची घोषणा केली. केंद्रानं जाहीर केलेल्या या यादीमध्ये पोलीस सेवेतील 1037 जणांना पदकं जाहीर करण्यात आली असून, गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार 214 जणांना शौर्य पदकानं सन्मानित केलं जाणार आहे.

पदकांच्या या संपूर्ण यादीत सर्वाधित शौर्य पदकं अर्थात तब्बल 52 पदकं सीआरपीएफ दलाला देण्यात आली आहेत. यामध्ये तेलंगणा पोलीस दलाच्या सेवेत असणाऱ्या हे कॉन्स्टेबल चदुवू येदैय्या यांना अद्वितीय शौर्य दाखवल्याबद्दल सर्वोच्च महत्त्वं असणारं PMG medal देण्यात येणार आहे. 

पाहा महाराष्ट्रातील मानकऱ्यांची यादी 

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या सेवेत असणाऱ्या पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर झालं आहे. अनेक मोठ्या गुन्ह्यांची प्रकरणं हाताळत त्यांनी पोलीस दलात महत्त्वाचं योगदान दिलं. याशिवाय अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद आणि संचालक राजेंद्र डहाळे यांनाही राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर झालं आहे. 

महाराष्ट्रातील पदक विजेत्यांची नावं 

शौर्य पदक विजेते  

डॉ. कुणाल शंकर सोनावणे - सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर 
दीपक रंभाजी उते - पोलीस उपनिरीक्षक 
कै. धनाजी तानाजी होनमाने - पोलीस उपनिरीक्षक (मरणोपरांत)
नागेशकुमार बोंड्यालू मदारबोईना-  नायक पोलीस हवालदार 
शकिल युसूफ शेख- पोलीस हवालदार 
विश्वनाथ समैय्या पेंडम - पोलीस हवालदार 
विवेक मानकू नरोटे -  पोलीस हवालदार 
मोरेश्वर नामदेव पोटवी - पोलीस हवालदार 
कैलास चुंगा कुळमेठे - पोलीस हवालदार 
कोटला बोटू कोरामी - पोलीस हवालदार 
कोर्के सन्नी वेलाडी- पोलीस हवालदार 
महादेव विष्णू वानखेडे - पोलीस हवालदार 
अनुज मिलिंद तरे - अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक 
राहुल नामदेव नेव्हाडे- पोलीस उपनिरीक्षक 
विजय दादासो सपकाळ - पोलीस उपनिरीक्षक 
महेश बोरू मिच्छा- हेड कॉन्स्टेबल 
समैय्या लिंगय्या असम - नायक पोलीस हवालदार 

उल्लेखनीय सेवा पुरस्कार

श्री. चिरंजीव रामच्छबिला प्रसाद- अतिरिक्त महासंचालक, महाराष्ट्र 
श्री. राजेंद्र बाजीराव डहाळे- संचालक, महाराष्ट्र 
श्री. सतीश रघुवीर गोवेकर, पोलीस सहआयुक्त, महाराष्ट्र 

पोलीस दलात अनेक वर्षांपासून सेवेत असणाऱ्या आणि विशेष सेवा देणाऱ्या अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात येणार असून पदक विजेत्यांच्या नावांची संपूर्ण य़ादी पाहण्यासाठी इथं क्लिक करा