'हर घर तिरंगा' अभियानातंर्गत पीएम मोदींचं देशवासियांना आवाहन, 13 ते 15 ऑगस्टदरम्यान करा 'हे' काम

देशाच्या स्वांतत्र्यदिनानिमित्ताने दिल्लीत हर घर तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. यात अनेक केंद्रीय मंत्र्यांनी भाग घेतला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. प्रगती मैदान ते इंडिया गेट अशी ही रॅली काढण्यात आली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक आवाहन केलं आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 12, 2023, 02:12 PM IST
'हर घर तिरंगा' अभियानातंर्गत पीएम मोदींचं देशवासियांना आवाहन, 13 ते 15 ऑगस्टदरम्यान करा 'हे' काम title=

Har Ghar Tiranga : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये पतंप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'हर घर तिरंगा' अभियानाचा (Har Ghar Tiranga Campaign)  सुरुवात केली. यावर्षी देखेली पंतप्रधानांनी करोडो भारतीयांना आवाहन केलं आहे. भारताचा तिरंगा राष्ट्रीय एकतेचं प्रतीक असल्याचं पीएम मोदी यांनी म्हटलं आहे. पीएम मोदी यांनी एक ट्विट केलं असून 'हर घर तिरंगा' अभियानातंर्गत लोकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि याचा सेल्फी (Selfie) 'हर घर तिरंगा' वेबसाईटवर अपलोड करावा असं आवाहन केलं आहे.  https://harghartiranga.com या वेबसाईटवर आपला सेल्फी अपलोड करावा,असं पीएम मोदी यांनी म्हटलं आहे. 

स्वातंत्र्यदिनानिमित्ताने राजधानी दिल्लीत 'हर घर तिरंगा' बाईक रॅली काढण्यात आली. यात अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सहभाग घेतला होता. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. प्रगती मैदान ते इंडिया गेट अशी ही रॅली काढण्यात आली.

गेल्यावर्षी या वेबसाईटवर जवळपास सहा कोटी लोकांनी तिरंग्यासोबतचा सेल्फी अपलोड केला होता. या 15 तारखेला भारत स्वातंत्र्याची 76 वर्ष पूर्ण करणार आहे. हर घर तिरंगा अभियान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाला एक नवी उर्जा देणारा आहे. देशवासियांना हे अभियान यावर्षी एका नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे. यासाठी 13 ते 15 ऑगस्टदरम्यान देशवासियांनी आन-बान आणि शान राखत राष्ट्रीय ध्वज आपल्या घरावर फडकावावा आणि याचा सेल्फी वेबसाईटवर अपलोड करावा असं आवाहन केलं आहे. 

तिरंग्याचा इतिहास
भारताचा पहिला राष्ट्रीय ध्वज 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकाताच्या पारसी बागान स्क्वायरवर फडकवण्यात आला होता. त्यावेळी झेंड्यांचा रंग लाल, पिवळा आणि हिरवा होता. 1931 मध्ये तिरंगा ध्वज आपला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्याचा ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला. हा ध्वज केसरी, पांढरा आणि हिरवा रंगाचा होता आणि मध्यभागी महात्मा गांधींचा चरखा होता. पुढे यात काही बदल करण्यात आले. तिरंग्यात मध्यभागी अशोक चक्राची जोडणी करण्यात आली. भारतीय तिरंगा अधिकृतपणे 22 जुलै 1947 रोजी स्वीकारण्यात आला. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी प्रथम फडकवण्यात आला.

तिरंग्यात शीर्षस्थानी केसरी रंग आहे जो देशाच्या शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहे. मध्यभागी पांढरा रंग म्हणजे शांतता आणि सत्याचं प्रतीक आहे. तळाचा हिरवा रंग जमिनीची सुपीकता, वृद्धि आणि शुभता दर्शवतो. अशोक चक्र, ज्याला धर्म चक्र असंही म्हणतात. अशोकचक्रात 24 आऱ्या आहेत, ज्या गतिमान जीवनाचं प्रतिनिधित्व करतात.