मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाबाधितांचा देशातील आकडा हा ६६ लाखांच्या पार गेला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरात ७४ हजार ४४२ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत तर ९०३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण ६६ लाख २३ हजार ८१६ पर्यंत पोहोचली आहे.
देशभरातील एकूण ६६ लाख २३ हजार ८१६ करोनाबाधितांमध्ये ९ लाख ३४ हजार ४२७ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले ५५ लाख ८६ हजार ७०४ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख २ हजार ६८५ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.
India's #COVID19 tally crosses 66-lakh mark with a spike of 74,442 new cases & 903 deaths reported in last 24 hours.
Total case tally stands at 66,23,816 including 9,34,427 active cases, 55,86,704 cured/discharged/migrated cases & 1,02,685 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/wQ0R1mVeYl
— ANI (@ANI) October 5, 2020
कोरोना महामारीविरोधात जगभरात लस शोधण्याच काम सुरू आहे. अनेक देशातील लस तिसऱ्या टप्प्यात आहे. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी कोरोना व्हॅक्सीनच्या ब्लू प्रिंटबद्दल माहिती दिली. त्यांच म्हणणं आहे की, पुढच्या वर्षापर्यंत कोरोनाची लस तयार होईस.
कोरोनाच्या व्हॅक्सीनबाबत जगभरात प्रयत्न सुरू आहे. अनेक देशांनी तर व्हॅक्सीन तयार केल्याचा दावा देखील केली आहे. मात्र आतापर्यंत कोणत्याच व्हॅक्सीनला जगभरात वापरण्याची परवानगी मिळालेली नाही. अशातच आरोग्य मंत्र्यांनी १३० करोड भारतीय जनतेने दिलासादायक माहिती दिली आहे.