मुंबई: जगभरात कोरोनाचं सावट अजूनही कायम आहे. एकीकडे डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा जगातील काही देशांमध्ये संसर्ग वाढत असताना भारतासाठी मात्र काहीसा दिलासा आहे. ऑक्टोबर महिन्यात तिसरी लाट येणार असंही सांगितलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी एक दिलासादायी गोष्ट सांगितली आहे. भारतात कोरोना एन्डेमिक स्टेजवर येण्याच्या मार्गावर आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा धोका पूर्णपणे संपुष्टात आतातरी येणार नाही. मात्र या कोरोनाच्या संसर्गासोबत जगू शकतील. भारतात मात्र सध्या आणि पुढील काळात कदाचित कोरोना हा सौम्य किंवा मध्यम स्वरुपातल्या संसर्ग स्थितीत असू शकतो. एन्डेमिक म्हणजे जिथे लोकं संसर्गासह जगणं शिकू लागतात. थोडक्यात संसर्गाचा प्रभाव काहीसा ओसरतो. असंही त्या म्हणाल्या आहेत.
वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार भारतातील लोकसंख्या अधिक आहे. संपूर्ण परिस्थितीचा विचार करता कोरोनाची स्थितीतही चढ-उतार पाहायला मिळू शकतात. मात्र येत्या काळात लोक या संसर्गासह जगणं शिकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 2022 च्या अखेरपर्यंत आपण 70 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण केलं असेल अशा टप्प्यावर असणार आहोत.
मुलांमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग हळूहळू पसरू लागला आहे. मात्र पालकांना घाबरण्याची आवश्यकता नाही असाही डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या आहेत. मुलांमध्ये कोव्हिडची सौम्य लक्षणं आढळू शकतात असं सीरो सर्व्हेमधून समोर आलं आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही असंही त्या म्हणाल्या आहेत. भारतात कोरोना हा एन्डेमिक स्टेजवर येण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे.