Man Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्ससोबत दिसणार साहसी पंतप्रधान मोदी

पाहा या कार्यक्रमाचा प्रोमो

Updated: Jul 29, 2019, 01:12 PM IST
 Man Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्ससोबत दिसणार साहसी पंतप्रधान मोदी
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / व्हिडिओ स्क्रीनकॅप्चर

मुंबई : टेलिव्हिजन कार्यक्रमांच्या गर्दीत आपली अशी वेगळी लोकप्रियता टीकवून असणाऱ्या आणि चौकटीबद्ध कार्यक्रमांना कायमच शह देणाऱ्या Man Vs Wild या साहसी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले आहेत. खुद्द बेअर ग्रिल्स यानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिली.  

मोदींची विशेष उपस्थिती असणाऱ्या Man Vs Wild च्या खास भागाची काही सेकंदांची झलक त्याने सर्वांच्या भेटीला आली. यामध्ये पंतप्रधान मोदी हे बेअरच्या साथीने काही साहसी कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. कार्यक्रमाच्या खास भागाची ही झलक पाहता, सोशल मीडियावर लगेचच #PMModionDiscovery हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला. 

 
 
 
 

A post shared by Bear Grylls OBE (@beargrylls) on

'जवळपास १८० देशातील नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तीमत्वाचा कधीही न पाहिलेला पैलू पाहतील. पर्यावरणातील बदल आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनाच्या निमित्ताने ते सर्वांपर्यंत पोहोचतील', असं लिहित बेअरने एक व्हिडिओ पोस्ट केला. १२ ऑगस्टला रात्री ९ वाजता हा खास भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्यामुळे याची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे. 

मुख्य म्हणजे बेअर ग्रिल्स हा त्याच्या साहसी वृत्तीसाठी आणि काही अफलातून करामतींसाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याला आता मोदींची जोड मिळताच प्रेक्षकांना नवं काय पाहायला मिळणार, हाच कुतूहलपूर्ण प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.