RBI : रिझर्व्ह बँकेच्या 'या' निर्णयाचा फायदा या खातेधारकांना होणार

 रिझर्व्ह बँकेच्या 'या' निर्णयाचा फायदा Payments bank खातेधारकांना होणार आहे.

Updated: Apr 7, 2021, 02:15 PM IST
 RBI : रिझर्व्ह बँकेच्या 'या' निर्णयाचा फायदा या खातेधारकांना होणार title=
संग्रहित फोटो

मुंबई : रिझर्व्ह बँंकेने (RBI) पतधोरण जाहीर करताना निर्णय मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. यामुळे देशातील पेमेंट बँका ( Payments bank ) आणि त्यांच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून पेमेंट बँकाकडून ( Payments bank ) डिपॉझिट मर्यादा वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. त्यांची मागणी RBIने मान्य केली आहे. त्यामुळे पेमेंट बँकांना आणि लाखो ग्राहकांना दिलासा दिला.

रिझर्व्ह बँंकेचे पतधोरण जाहीर, शेअर बाजारात तेजी

RBIने पेमेंट बँक खात्यातील दिवसअखेर शिल्लक (डिपॉझिट) मर्यादा 2,00,000  रुपयापर्यंत वाढवली आहे. यापूर्वी 1,00,000  रुपयांची मर्यादा होती. (Payments bank deposit limit hiked to Rs 2 lakh by RBI) दरम्यान, केंद्र सरकारने ठेवींवरील विमा संरक्षण 5 लाख रुपयांपर्यंत वाढवल्यानंतर पेमेंट बँकांनी खात्यातील शिल्लक मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती. त्यावर आज आरबीआयने पतधोरण जाहीर करताना हा निर्णय घेतला.  त्यामुळे पेमेंट खात्यातील शिलकीची मर्यादा वाढवल्याने लाखो पेमेंट बँक खातेदारांना फायदा होणार आहे. त्यांना आता मोठ्या रकमेचे डिजिटल व्यवहार करणे शक्य होणार आहे.

RBIच्या या नव्या निर्णयामुळे पेमेंट बँकांना आता बँकिंग क्षेत्रातील स्पर्धेत समान संधी मिळेल, अशी शक्यता आहे. परवानाधारक पेमेंट बँकांसाठी 27 नोव्हेंबर 2014 रोजी जारी केलेल्या नियमावलीनुसार वैयक्तिक कर्जदाराला त्याच्या बँक खात्यात एक लाख रुपयांची शिल्लक ठेवण्याची परवानगी होती. आता ती दोन लाख रुपये करण्यात आली असल्याचे आरबीआयने आज जाहीर केले.

पेटीएम पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक या आघाडीच्या पेमेंट बँका सध्या कार्यरत आहेत. या बँकांकडून बचत खाते सेवा दिली जाते. ज्यात ग्राहकाला पैसे जमा करण्याची सुविधा आहे. मात्र पेमेंट बँकाकडून कर्ज दिली जात नाही. एटीएम, डेबिट कार्ड पेमेंट बँक देत असतात, मात्र क्रेडिट कार्ड देत नाहीत. ज्या ठिकाणी बँकिंग सेवा पोहोचली नाही अशा ठिकाणी पेमेंट बँकांना सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे.