काँग्रेसने पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर दिलंच नसतं, पित्रोदांच्या वक्तव्यानंतर मोदींची खरमरीत टीका

पंतप्रधानांनी जनतेला आवाहन केलं की... 

Updated: Mar 22, 2019, 11:47 AM IST
काँग्रेसने पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर दिलंच नसतं, पित्रोदांच्या वक्तव्यानंतर मोदींची खरमरीत टीका title=

नवी दिल्ली : गांधी घराण्याचे निष्ठावंत सॅम पित्रोदा यांनी बालाकोट येथे भारतीय वायुदलाकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. ज्यानंतर त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पित्रोदांला टोला हाणला. सर्वाधिक विश्वासार्ह सल्लागार आणि काँग्रेस अध्यक्षांच्या प्रमुख मार्गदर्शकांपैकी एक असणाऱ्या सॅम पित्रोदा  यांनी सैन्यदलावर अविश्वास दाखवून पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिवसाची काँग्रेसच्या वतीने भारतीय सुरुवात केली आहे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. 

भारतीय वायुदलाने बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ला अर्थात एअर स्ट्राईकवर वारंवार प्रश्न उपस्थिच करत विरोधक एक प्रकारे सैन्यदलाला अपमानित करत आहेत, असं म्हणत पंतप्रधानांनी भारतीय जनतेला आवाहन केलं. विरोधकांना त्यांच्या या बेताल वक्तव्यांबद्दल प्रश्न विचारण्याचं आवाहन त्यांनी केलं. १३० कोटी भारतीय हे विरोधकांच्या कृत्यांना कधीही विसरणार नाहीत. कारण, हा संपूर्ण देश सैन्यदलाच्या साथीने उभा आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. 

काय म्हणाले सॅम पित्रोदा? 

पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा भगात असणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकविषयी पित्रोदा यांना विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी ही वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. 'मला याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. कारण, मी न्यूयॉर्क टाईम्स आणि इतर माध्यमांमध्ये याविषयीचं वृत्त वाचलं. खरंच असा झाला? खरंच ३०० दहशतवादी ठार करण्यात आले? एक नागरिक म्हणून मला या गोष्टी माहित असल्या पाहिजेत. यामुळे मी राष्ट्रवादी नाही असा असा अर्त होत नाही', असं ते म्हणाले. सोबतच ज्यावेळी बालाकोट हल्ल्यात कोणीही ठार झालेलं नाही असं जेव्हा कळतं तेव्हा एक भारतीय म्हणून या गोष्टीचं दु:ख वाटत असल्याचं विधानही त्यांनी केलं होतं.