सुखोई विमानावरुन ब्राह्योसची पहिल्यांदा चाचणी

सर्जिकल स्ट्राइक करण्यासाठी ज्याचा वापर प्रामुख्याने केला जाऊ शकतो आणि शूत्रूराष्ट्राला धडकी भरण्याची ज्याची क्षमता असणाऱ्या ब्राह्मोसची आता...

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 14, 2017, 08:06 PM IST
सुखोई विमानावरुन ब्राह्योसची पहिल्यांदा चाचणी title=

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राइक करण्यासाठी ज्याचा वापर प्रामुख्याने केला जाऊ शकतो आणि शूत्रूराष्ट्राला धडकी भरण्याची  ज्याची क्षमता असणाऱ्या ब्राह्मोसची आता सुखोई विमानावरुन चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय लष्कराची ताकद वाढलेय.

या चाचणीमुळे पाकिस्तानसह शत्रू राष्ट्राना आता विचार करावा लागणार आहे. भारताने ब्राम्ह्योसची चाचणी सुखोई विमानावरुन करण्यासाठी हालचाल सुरु केलेय. आता अत्याधुनिक लढाऊ विमान ज्याचा नाव लौकिक आहे त्या सुखोई विमानानावरुन ही चाचणी घेणार आहे. त्यामुळे शत्रूराष्ट्रांना वाकड्या नजरेने भारताकडे पाहता येणार नाही.

दरम्यान, भारताने पाकव्यापत हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राइक केली होती. आता तर अशी वेळ आली तर पुन्हा अशी कारवाई करण्याची क्षमता सुखोई विमानामुळे वाढणार आहे. सुखोई विमान ही भारताच्या हवाई ताफ्यामधील महत्त्वाचे आहे. आता सुखोई विमानाची हल्ला करण्याची क्षमता वाढवण्यासाठी सुखोई विमानाबरोबर शस्त्रसाठ्यात ब्राह्मोस क्षेपणास्त्राचीही चाचणी करण्यात येणार आहे.

सुखोई लढाऊ विमानातून ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात येत असल्याने मारक क्षमतेत दुप्पटीने वाढ होणार आहे. हवेतून जमिनीवर मारा करण्यात सक्षम असणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र शत्रू राष्ट्रात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे शत्रूराष्ट्रांना आता जरब बसण्यास मदत होणार आहे.

जमिनीत असणाऱ्या अण्वस्त्रांचे बंकर्स, कमांड आणि कंट्रोल सेंटर्स आणि समुद्रावरुन उडणारी विमाने यांना लक्ष करणे आता शक्य होणार आहे. ब्राह्मोसमध्ये ही क्षमता आहे. त्यामुळे शत्रू राष्ट्रावर वचक ठेवण्यात ब्राह्मोस निर्णायक भूमिका बजावू शकणार आहे. लष्कराने गेल्या दशकात २९० किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या ब्राह्मोस क्षेपणस्त्राचा समावेश आपल्या ताफ्यात केलाय.