पाकिस्तानी सैन्यातील माजी अधिकाऱ्यांकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण

बालाकोट येथील 'जैश....'च्या तळामध्ये दिलं प्रशिक्षण   

Updated: Feb 27, 2019, 09:57 AM IST
पाकिस्तानी सैन्यातील माजी अधिकाऱ्यांकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण title=

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीमरमधील बालाकोट येथे असणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या तळाचा भारताकडून नायनाट करण्यात आला. २६ फेब्रुवारी म्हणजेच मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास भारतीय वायुदलाकडून ही कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये बालाकोट तळामध्ये असणाऱ्या जवळपास ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या हल्ल्यात जैशचे २५ प्रशिक्षक, संघटनेत सहभागी होण्यासाठी आलेले आणि प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले दशतवादी आणि जैशचा म्होरक्या मसूद अझरचा मेहुणा मौलाना युसूफ अझरचाही समावेश आहे. मुख्य म्हणजे सीमेपलीकड़े दहशतवादी कारवायांमध्ये सैन्यदलाच्या माजी अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची बाब आता उघड झाली आहे. गृह खात्याच्या सूत्रांकडून याविषयीची माहिती मिळाल्याचं म्हटलं जात आहे. 

'इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानी सैन्यदलातील माजी अधिकारीची बालाकोट येथील दहशतवदी तळांवर होणाऱ्या प्रशिक्षणात योगदान देतात. सैन्यदल अधिकाऱ्यांसोबतच खुद्द मसून अझरही काही खास निमित्ताने या दहशतवाद्यांना कारवाया करण्यासाठी प्रोत्साहित करणारी भाषणं करत असे हा खुलासा सूत्रांनी केला आहे. फक्त जैश-ए- मोहम्मदच नव्हे, तर हिज्बुल मुजाहिद्दीनकडूनही या दहशतवादी प्रशिक्षण केंद्राचा वापर केला जात असल्याची माहिती आता समोर येत आहे. 

वाचा : 'एअरस्ट्राईक'साठी बालाकोटची निवड का? अशी होती रणनीती...

बालाकोटमध्ये दिलं जायचं हे प्रशिक्षण 

बालाकोट येथे दहशतवाद्यांना दौरा ए खासअंतर्गत शस्त्रांविषयीची माहिची, ती कशी चालवायती याविषयीचं तंत्र आणमि स्फोटकं, स्फोट कसे घडवून आणायचे याविषयीचं प्रशिक्षण देण्यात येत होतं. सुरक्षा दलाच्या ताफ्यांवर हल्ला करण्यापासून ते ब़ॉम्ब कुठे आणि कसा बसवायचा इथपर्यंतचं प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याशिवाय आत्मघातील हल्ला घडवून आणणं, या हल्ल्यांसाठी वाहनं तय़ार करणं, अतितणावाच्या परिस्थितीतही जीव वाचवून निघणं अशा विविध प्रकारचं प्रशिक्षण त्यांना दिलं जात होतं. सूत्रांच्या माहितीनुसार जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी ह आत्मघाती हल्ला घडवून आणण्यासाठी ओळले जात असून, धर्माला ते अनन्यसाधारण महत्त्वं देतात.