भारतातल्या 'या' गावात 100 पेक्षा जास्त IAS, प्रत्येक घरात एक सरकारी अधिकारी...

Village of IAS Officers : भारतात एक असं गाव आहे ज्या गावात 100 हून अधिक आयएएस अधिकारी आहेत. या गावातली सातपैकी चार मुलं JEE आणि NEET सारखअया कठिण परीक्षा पहिल्या फटक्यात पास करतात. 

राजीव कासले | Updated: Oct 17, 2024, 06:32 PM IST
भारतातल्या 'या' गावात 100 पेक्षा जास्त IAS, प्रत्येक घरात एक सरकारी अधिकारी...  title=

Village of IAS Officers : भारतात एक असं गाव आहे ज्या गावात 100 हून अधिक आयएएस अधिकारी (IAS Officer) आहेत. या गावातली सातपैकी चार मुलं JEE आणि NEET सारख्या कठिण परीक्षा पहिल्या फटक्यात पास करतात. मध्यप्रदेशमधल्या (Madhya Pradesh) धार जिल्ह्यातील सुदूर इथलं पडियाल गाव हे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावातील प्रत्येक लहान मुलगा मोठेपणी सरकारी नोकरी, इंजिनअर किंवा डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहातो. पाच हजार लोकवस्ती असलेल्या या आदिवासी बहुल गावात तब्बल 100 हून अधिक तरुण भारताच्या वेगवेगळ्या राज्यात अधिकारी पदावर काम करत आहेत. 

गावातील सुमारे  90 टक्के लोकसंख्या भिल्ल जमातीची आहे. भिल्ल हा एक वांशिक समुदाय आहे जो मध्य भारतातील धार, झाबुआ, पश्चिम निमार जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील धुळे, जळगाव इथं राहातो. त राजस्थानमध्येही या जातीची लोकसंख्या आढळते.

मध्यप्रदेशच्या सरकारी नोंदीनुसार पडियाल गावाची साक्षरता तब्बल 90 टक्के इतकी आहे. सरकारीने दिलेल्या आकडेवारीनुसार दोन वर्षांपूर्वी या गावातील प्रशासकिय अधिकाऱ्यांची संख्या 70 च्या आसापस होती. आता 2024 मध्ये ही संख्या 100च्या वर गेली आहे. यात कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीश, भारतीय पोलीस सेवा अधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, भारतीय अभियांत्रिकी सेवा अधिकारी, डॉक्टर, प्रॉसिक्यूशन अधिकारी, वन अधिकारी इत्यादींचा समावेश आहे.

या गावाच्या साक्षरतेचा दर तेव्हा लक्षात आला जेव्हा सातपैकी चार मुलांनी नीटची परीक्षा पास केली, तर इतर तीन मुलांनी जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण केली. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या गावातील प्रत्येक घरात एक सरकारी अधिकारी आहे. इथल्या जुन्या जाणत्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या गावातील तरुणांनी स्वातंत्र्यानंतरच्या काळापासूनच स्पर्धात्मक परिक्षेत सहभागी होण्यास सुरुवात केली होती. या गावात मुलांच्या शिक्षणावर विशेष भर दिला जातो. शाळेत असल्यापासून मुलं तंत्रज्ञान, वैद्यकीय, इंजिनिअरिंगसाठी द्यावा लागणाऱ्या परीक्षेची तयारी सुरु करतात. 

प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी गावातील मुलांसाठी स्मार्ट क्लास चालवतात. पडियाल गावातील एक डझनहून जास्त अधिकारी आता निवृत् झाले असून गावात स्थायिक झाले आहेत. गावातील मुलांसाठी या अधिकाऱ्यांकडून विविध योजना राबवल्या जातात. मोठ्या लोकांकडून प्रेरणा घेऊन शालेय विद्यार्थीही मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न पाहातात. या गावातील तरुण सरकारी नोकरीबरोबरच उद्योग क्षेत्रातही आहेत. अनेक तरुण अमेरिका, मलेशिया देशात वास्तव्याला आहेत. गावात एक उच्च माध्यमिक शाळा असून, त्यामध्ये 23 शिक्षक 702 विद्यार्थ्यांना शिकवतात.