भारतीय सैन्याचं मोठं मनं, नेपाळ सैन्याला दिले 1 लाख कोरोना वॅक्सिन डोस

 एक लाख कोरोना वॅक्सिन डोस भेट 

Updated: Mar 30, 2021, 04:32 PM IST
भारतीय सैन्याचं मोठं मनं, नेपाळ सैन्याला दिले 1 लाख कोरोना वॅक्सिन डोस title=

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने नेपाळ सैन्याला एक लाख कोरोना वॅक्सिन डोस भेट दिली आहे. नेपाळच्या त्रिभुवन विमानतळावर वॅक्सिन पोहोचवताच नेपाळी सैन्याने स्वागत केले. भारतीय सैन्य आणि नेपाळ यांच्यातील संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. यापुर्वी नेपाळमध्ये भारतीय लष्कराच्या प्रमुखांचा सन्मान करण्यात आला होता.

भारत सरकारने मैत्री अभियानाअंतर्गत नेपाळ लष्कराला लस दिली आहे. यापूर्वी भारताने नेपाळला कोरोना वॅक्सिनचे दहा लाख डोस दिले होती. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनीही याची प्रशंसा केली. नेपाळचे भारतातील राजदूत निलांबर आचार्य यांनीही भारताचे आभार मानले आहेत. दोन्ही देशांनी आपले संबंध असेच कायम ठेवण्याविषयी विचार कराव असे ते म्हणाले.

'कोरोना व्हायरस लसच्या दहा लाख डोस दिल्याबद्दल आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत. आम्ही मागवलेले डोस मिळतील याची आम्हाला खात्री आहे. भारत चांगला शेजारी आणि मित्र असल्याचे आचार्य म्हणाले. भारत आणि नेपाळमध्ये सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये बरीच मूल्ये आहेत आणि दोन्ही देश एकाच सभ्यतेतून आले असल्याचे ते म्हणाले.