एम्स रुग्णालयात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची बायपास सर्जरी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आरोग्याविषयी महत्वाची माहिती

Updated: Mar 30, 2021, 04:50 PM IST
एम्स रुग्णालयात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची बायपास सर्जरी title=

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनातून मिळालेल्या माहितीनुसार, आज त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी छातीत दुखू लागल्याने 75 वर्षीय राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना आर्मीच्या संशोधन आणि रेफरल रुग्णालयात दाखल झाले. इथे त्यांच्या आरोग्याची तपासणी झाली.

सैन्य रुग्णालयाच्या हेल्थ बुलेटिननुसार, शनिवारी दुपारी राष्ट्रपतींना उपचारानंतर एम्समध्ये पाठविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. सध्या राष्ट्रपतींची प्रकृती स्थिर असून एम्स रुग्णालयाच्या कार्डिओलॉजिस्टच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपतींच्या बिघडलेल्या प्रकृतीवर चिंता व्यक्त केली होती. पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या मुलाशी बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील राष्ट्रपतींच्या कुटुंबाशी बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.