काश्मीर : भारतातर्फे एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडून होणारी गोळीबार सुरूच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानने अनेकदा शस्त्र संधीचे उल्लंघन केले आहे. पण आता भारताने पाकिस्तानला इशारा दिला आहे. पाकिस्तानने गोळीबारी थांबवावी तसेच सर्वसामान्यांना निशाणा बनवू नका असे भारताकडून सांगण्यात आले आहे. भारताला उकसवण्याचा प्रयत्न करु नका. असे झाल्यास भारताकडून जशास तसे उत्तर दिले जाईल असे सांगण्यात आले.
Indian Army: Post our warning to Pakistan Army “NOT to target civilian areas”,overall situation along LoC remains relatively calm. In last 24 hours, Pakistan Army resorted to intense & unprovoked firing with heavy caliber weapons in selected areas of Krishna Ghati and Sunderbani pic.twitter.com/x3JuUMoq7U
— ANI (@ANI) March 6, 2019
एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानने 53 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यामुळे सीमेवरील पुंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये सतत गोळीबारी सुरू असते. पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारामुळे सर्वसाधारण नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कारण एक-दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पाकिस्तानतर्फे पुन्हा गोळीबारीला सुरूवात होते. आता भारत याविरुद्ध चांगलाच आक्रमक झालेला दिसत आहे. आमच्या नागरिकांना निशाणा बनवल्यास खबरदार, अशी तंबीही देण्यात आली आहे.
Indian Army: The same was effectively retaliated by the Indian Army. There have been no casualties on the Indian side. https://t.co/WBEfNBNaNx
— ANI (@ANI) March 6, 2019
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने नौशहराच्या झंगड सेक्टरमध्ये गोळीबारी केली. या गोळीबारीमध्ये एकाच परिवारातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आणि एक जवान आणि चार ग्रामस्थ जखमी झाले. 50 हून अधिक घरांना यामुळे नुकसान झाले. 50 हून अधिक सीमेजवळील गावांमध्ये याचा प्रभाव दिसला.