Indian Currency: एक रुपयाचं हे नाणं तुम्हाला देऊ शकतो 10 कोटी रुपये

जर तुम्हाला जुन्या नोटा किंवा नाणी गोळा करण्याचा छंद असेल तर हा छंद तुम्हाला मोठा फायदा देऊ शकतो. 

Updated: Oct 20, 2021, 02:44 PM IST
Indian Currency: एक रुपयाचं हे नाणं तुम्हाला देऊ शकतो 10 कोटी रुपये title=

मुंबई : जर तुम्हाला जुन्या नोटा किंवा नाणी गोळा करण्याचा छंद असेल तर हा छंद तुम्हाला मोठा फायदा देऊ शकतो. पुष्कळ लोकांना प्राचीन वस्तू गोळा करण्याची आवड आहे. अशा लोकांकडे जुन्या आणि दुर्मिळ नाण्यांचा संग्रह असतो. असा छंद असणाऱ्यांना न्युमिस्मेटिस्ट म्हणतात.

कधीकधी ते दुर्मिळ नाण्यांसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असतात. आज आम्ही तुम्हाला 1 रुपयांच्या अशा नाण्याबद्दल सांगत आहोत जे तुम्हाला एका क्षणात करोडपती बनवेल. तेही 1 कोटी, 2 कोटी रुपये नाही… तर 10 कोटी रुपये मिळतील.

1 रुपयाचे हे नाणे 10 कोटी रुपयांना लिलाव केला जात आहे. हे नाणे ब्रिटिश राजवटीतील आहे. हे नाणे 1885 चे असावे. जर तुमच्याकडे 1 रुपयाचे असे नाणे असेल, ज्यावर 1885 साल छापले आहे. आपण ते ऑनलाइन लिलावासाठी ठेवू शकता.

ऑनलाईन विक्रीमध्ये तुम्ही या नाण्यावर 9 कोटी 99 लाख रुपयांपर्यंत जिंकू शकता. त्याचा लिलाव कोठे करायचा ते आता जाणून घेऊया. मीडिया रिपोर्टनुसार, नुकत्याच एका ऑनलाइन लिलावात, 1 रुपयांच्या नाण्याला 10 कोटी रुपये मिळाले आहेत. ज्या व्यक्तीने हे नाणे ऑनलाइन लिलावात विकले तो श्रीमंत झाला.

अनेक ऑनलाइन साईट्स (Quickr, eBay, olx, indiancoinmill, indiamart, coinbazar इ.) ही नाणी विकण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी प्लॅटफॉर्म पुरवतात. यावर तुम्हाला विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागेल.

ऑनलाइन लिलाव कसा करावा

जुन्या नाण्यांचा लिलाव करण्यासाठी तुम्हाला OLX ला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी तयार करावा लागेल. यासह, तुम्ही indiamart.com वर एक समान खाते तयार करून नाण्यांचा लिलाव करून पैसे कमवू शकता.

लिलावासाठी तुम्हाला तुमच्या नाण्याचा फोटो शेअर करावा लागेल. बरेच लोक पुरातन वस्तू खरेदी करतात. काही लोक जुनी नाणी शोधत राहतात. त्यासाठी ते भरमसाठ रक्कम मोजतात.

विक्रेते आणि खरेदीदार यांच्यात सौदा

नाण्यांच्या खरेदी आणि विक्रीमध्ये तुम्हाला सर्वात जास्त लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, या प्रकारचा करार विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात होतो. यामध्ये कोणत्याही प्रकारे आरबीआयची भूमिका नाही. आरबीआयने काही काळापूर्वी अशा सौद्यांबाबत इशारा दिला होता की, त्यात केंद्रीय बँकेची कोणतीही भूमिका नाही आणि आरबीआय त्याचा प्रचार करत नाही.