अमेरिकेत चाललंय तरी काय? आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, तीन आठवड्यातील चौथा मृत्यू

Indian Student Death in US: अमेरिकेत (US) आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा (Indian Student) मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या वर्षातील हे चौथं प्रकरण आहे. यानंतर न्यूयॉर्कमधील (New York) इंडियन मिशनने संताप व्यक्त केला असून, चौकशीची मागणी केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 2, 2024, 11:45 AM IST
अमेरिकेत चाललंय तरी काय? आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, तीन आठवड्यातील चौथा मृत्यू title=

Indian Student Death in US: अमेरिकेत (US) आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा (Indian Student) मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तिसऱ्या आठवड्यातील ही चौथी घटना आहे. 19 वर्षीय श्रेयस रेड्डी बेनिगेरी (Shreyas Reddy Benigeri) ओहियोमधील (Ohio) लिंडर स्कूल ऑफ बिजनेसमध्ये (Linder School of Business) शिकत होता. त्याचे आई-वडील हैदराबादमध्ये (Hyderabad) वास्तव्यास आहेत. पण श्रेयसकडे अमेरिकेचा पासपोर्ट होता. न्यूयॉर्कमधील इंडियन मिशनने (Indian Mission) याप्रकरणी संताप व्यक्त केला असून, चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान अधिकाऱ्यांनी या मृत्यूमागे कोणताही कट किंवा द्वेषपूर्ण भावना असल्याची शक्यता नाकारली आहे. 

"ओहायोमधील भारतीय वंशाचा श्रेयस रेड्डी बेनिगेरी या विद्यार्थ्याच्या दुर्दैवी निधनामुळे खूप दुःख झाले. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. सध्या तरी पोलिसांना यात काही संशयास्पद आढळत नाही आहे. दूतावास कुटुंबाच्या संपर्कात असून शक्य ती सर्व मदत करत आहे,” अशी माहिती न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने एक्सवरील पोस्टमध्ये दिली आहे. 

तीन आठवड्यातील चौथा मृत्यू

30 जानेवारीला अमेरिकेत बेपत्ता झालेला भारतीय विद्यार्थी नील आचार्यचा मृतदेह आढळला होता. मूळचा पुण्याचा असणारा नील आचार्य अमेरिकेतील प्रतिष्ठित Purdue University मध्ये शिकत होता. नील आचार्य बेपत्ता असल्याने त्याची आई गौरी आचार्य यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितली होती. विद्यापीठाच्या आवारातच नीलचा मृतदेह आढळला.

Tippecanoe County Coroner च्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11.30 वाजता अधिकाऱ्यांना वेस्ट लाफायेट येथील 500 एलीसन रोड येथे बोलावण्यात आलं होतं. फॉक्स 59 चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकारी पोहोचले असताना विद्यापीठात प्रयोगशाळेच्या बाहेर विद्यार्थी मृतावस्थेत आढळला. 

अमेरिकेत बेपत्ता झालेल्या पुण्यातील नील आचार्यचा मृत्यू; 2 दिवसांत 2 भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे खळबळ

 

दरम्यान या आठवड्याच्या सुरुवातीला विवेक सैनी या भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती. अमेरिकेतील लिथोनिया, जॉर्जिया येथे एका दुकानात एका बेघर माणसाने हातोड्याने वार करून त्याला निर्घृणपणे ठार केलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

तसंच अकुल धवन हा आणखी एक भारतीय विद्यार्थी जानेवारीत इलिनॉय अर्बाना-चॅम्पेन (UIUC) विद्यापीठाबाहेर मृतावस्थेत आढळला होता. शवविच्छेदन करण्यात आलं असता त्याचा मृत्यू हायपोथर्मियामुळे झाला असल्याचं समोर आलं होतं. पण त्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अकुल धवन बेपत्ता असतानाही विद्यापीठाने निष्काळजीपणा करत काही कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

अमेरिकेत 3 लाखापेक्षा अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या दोन वर्षांत 2 लाख विद्यार्थ्यांना अमेरिकेचा व्हिसा जारी करण्यात आला आहे. कोविडनंतर अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मानसिक तणाव, एकटेपणा आणि मादक द्रव्यांचे सेवन अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.