Railway Alert : तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा, अन्यथा...

Indian Railway Alert: भारतीय रेल्वे एक अलर्ट जारी केला आहे. याबाबत रेल्वेने ट्विट करत माहिती दिली आहे.  

Updated: Oct 22, 2021, 12:01 PM IST
Railway Alert : तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा, अन्यथा... title=
संग्रहित छाया

मुंबई : Indian Railway Alert: भारतीय रेल्वे एक अलर्ट जारी केला आहे. याबाबत रेल्वेने ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही रेल्वेने प्रवासाला निघण्यापूर्वी किंवा कुठे जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी महत्वाची आहे. कारण तुमच्यापुढे ही समस्या निर्माण होऊ शकते.

रेल्वेचे आरक्षण करायला गेला तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही. कारण पूर्व रेल्वेची (Eastern Railway)प्रवासी आरक्षण व्यवस्था काही काळ बंद राहणार आहे. पूर्व रेल्वेने ट्विट करताना म्हटले आहे की, प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) 23 ऑक्टोबर रोजी रात्री 23.45 ते 24 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.00 वाजेपर्यंत  (Passenger Reservation System, PRS) काम करणार नाही. (Indian Railway Alert: Due to maintenance activity, many online services of railways will be closed from 11:45 am on Saturday till 5 am on Sunday)

रेल्वेने ट्विट केले

पूर्व रेल्वेच्या (Eastern Railway) ट्विटनुसार, कोलकाताच्या पीआरएस डेटा सेंटरमध्ये देखभाल उपक्रमामुळे तिकीट निर्मिती होणार नाही. हे काम 23 ऑक्टोबर रोजी रात्री 23.45 ते 24 ऑक्टोबर पहाटे 5 वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आगाऊ तिकीट बुक करावे, अन्यथा त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सिस्टम येथे बंद राहणार

पूर्व रेल्वेने (Eastern Railway) सांगितले आहे की देखभाल उपक्रमादरम्यान, दक्षिण पूर्व रेल्वे, पूर्व कोस्ट रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, ईशान्य सीमावर्ती रेल्वे आणि पूर्व सर्व सेवा इंटरनेट बुकिंग, चौकशीसह अनेक सेवा बंद राहणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, आसाम यासह ईशान्य राज्यांमध्ये, या रेल्वे विभागाअंतर्गत येणारी राज्ये, रेल्वे तिकिटांची ऑनलाइन बुकिंग, ऑनलाइन रिटायरिंग रूम, चौकशी इ. सेवा उपलब्ध होणार नाहीत, याची रेल्वे प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे कळविले आहे.

हे यापूर्वी असे घडले आहे!

रेल्वे तिकीट काही काळासाठी आधीच बंद आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात दक्षिण रेल्वेकडून अशीच अधिसूचना जारी करण्यात आली होती. अधिसूचनेमध्ये असे म्हटले होते की नवीन डेटा सेंटर सुरू केले जात आहे, ज्यामुळे लोकांना काही काळ तिकीट बुकिंगसारख्या गोष्टींची समस्या निर्माण होईल, कारण त्यांच्याकडे आयआरसीटीसीची वेबसाईट उघडणार नाही.