Tata ला टक्कर देणार Mahindra; लाँच केल्या दोन दमदार इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या XEV 9e आणि BE 6e चे फिचर्स आणि किंमत

Mahindra New Electric Car Launch : इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा आता थेट टाटा मोटर्सला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आपल्या दोन इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. जाणून घ्या यांचे फिचर्स आणि किंमत...  

शिवराज यादव | Updated: Nov 26, 2024, 09:12 PM IST
Tata ला टक्कर देणार Mahindra; लाँच केल्या दोन दमदार इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या XEV 9e आणि BE 6e चे फिचर्स आणि किंमत title=

Mahindra XEV 9e & Mahindra BE 6e Launched: भारतीय बाजारपेठेत महिंद्राच्या गाड्यांचा एक वेगळा ग्राहक आहे. एसयुव्ही सेगमटेंमध्ये महिंद्राचा चांगलाच दबदबा आहे. दरम्यान आता Mahindra and Mahindra इलेक्ट्रिक कार मार्केटमध्येही इतर वाहन कंपन्यांना तगडी स्पर्धा देण्याच्या तयारीत आहे. महिंद्राने आपल्या दोन नव्या इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. कंपनीच्या इलेक्ट्रिक कारच्या पोर्टफोलिओत या नव्याने सामील झाल्या आहेत. तसंच या कंपनीच्या Born Electric SUV आहेत. याचा अर्थ या गाड्यांना कॉन्सेप्ट लेव्हलपासूनच इलेक्ट्रिक कार म्हणून डेव्हलप केलं जात होतं. 

महिंद्राने Mahindra XEV 9e आणि Mahindra BE 6e या दोन इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. यासाठी चेन्नईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासह आता इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये त्यांची थेट स्पर्धा टाटा मोटर्सशी होणार आहे. कारण सध्या इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये टाटा मोटर्सचा दबदबा आहे.

सिंगल चार्जमध्ये 500 किमीचा प्रवास

Mahindra & Mahindra ने लॉन्च केलेल्या दोन्ही इलेक्ट्रिक कारची रचना बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय ठेवण्यात आली आहे. ही मस्क्यूलर बॉडी आहे. BE 6e मध्ये ग्राहकांना 59 kWh आणि XEV 9e मध्ये 79 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही कार एका चार्जमध्ये 400 ते 500 किमीची रेंज देईल. या कार अवघ्या 20 मिनिटात 20 ते 80 टक्के चार्जिंग होतील. 

महिंद्राच्या या गाड्या INGLO प्लॅटफॉर्मवर डेव्हलप करण्यात आल्या आहेत. हे प्लॅटफॉर्म अतिरिक्त सुरक्षा प्रदान करतं. XEV 9e ची लांबी 4.789 मीटर असेल. तर तिचा ग्राउंड क्लीयरन्स 207 मिमी असेल. यात 663 लीटरची बूट स्पेस आणि 150 लीटरची फ्रंक (समोर बूट स्पेस उपलब्ध) असेल. तर BE 6e ची लांबी 4.371 मीटर असेल. तिचे ग्राउंड क्लीयरन्स देखील 207 मिमी असेल. यात 455 लिटरची बूट स्पेस आणि 45 लिटरची ट्रंक स्पेस असेल.

99.5% UV किरणांपासून सुरक्षा 

कंपनीने कारच्या लूकसह ग्राहकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली आहे. कार सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून (UV Rays) संरक्षण करेल अशाप्रकारे तयार करण्यात आली आहे. कंपनीने या कारच्या विंडशील्ड, छतावरील काच आणि साइड ग्लासवर यूव्ही संरक्षण कोटिंग केले आहे. यामुळे, ही कार यूव्ही किरणांपासून 99.5 टक्के संरक्षण करते.

यामुळे कार केबिन लवकर थंड होण्यास मदत होते. कंपनीचे म्हणणे आहे की या वैशिष्ट्यामुळे कारचे केबिन सामान्य कारच्या तुलनेत 40 टक्के वेगाने थंड होते.

फिचर्स काय आहेत?

या गाड्यांचं इंटिरिअर आणि एक्स्टिरिअर मिनिमलिस्ट ठेवण्यात आले आहेत. यात 2-स्पोक स्टीयरिंग व्हील मिळतीतल. केबिनमध्ये हवामान नियंत्रण, हवेशीर फ्रंट सीट, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले, पॉवर्ड फ्रंट सीट, वायरलेस मोबाइल चार्जिंग, ॲम्बियंस लाइटिंग, छतावर स्टारी लाईट यासारखे फिचर्स आहेत. 

किंमत किती?

या दोन्ही कार पॅक 1, पॅक 2 आणि पॅक 3 अशा तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत. यातील फक्त पॅक 1 च्या किंमतीचा खुलासा करण्यात आला आहे. 

Mahindra XEV 9e च्या पॅक 1 ची किंमत 21 लाख 90 हजार (एक्स-शोरुम) असेल. तर Mahindra BE 6e ची किंमत 18 लाख 90 हजार (एक्स-शोरुम) असेल. यामध्ये चार्जर आणि इंस्टॉलेशनचा खर्च जोडण्यात आलेला नाही.