चिंता मिटली; रेल्वेच्या 'या' नव्या ऑनलाईन सुविधेचा प्रवाशांना फायदाच फायदा

Indian Railway : काय आहे ही नवी सुविधा? तिचा वापर कधी आणि कसा करावा?  रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी.  

सायली पाटील | Updated: Jun 10, 2024, 01:42 PM IST
चिंता मिटली; रेल्वेच्या 'या' नव्या ऑनलाईन सुविधेचा प्रवाशांना फायदाच फायदा title=
Indian Railway New Online Service Mission Amanat will help To Find Lost Items In Train journey

Indian Railway Latest News : रेल्वेनं प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना या रेल्वे विभागाकडून प्रवासी वर्गाला नेमक्या किती आणि कोणत्या सुविधा दिल्या जातात याची अनेकदा माहिती नसते. प्रवाशांवर रेल्वेकडून सुविधांची बरसात केली जाते असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. खिशाला परवडेल इतक्या दरात तिकिट उपलब्ध करून देण्यापासून प्रवासादरम्यान प्रवाशांच्या खाण्यापिण्यासाठीच्या तरतुदी करण्यापर्यंत रेल्वे प्रशासन महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतं. याच रेल्वे विभागाच्या वतीनं पुन्हा एकदा प्रवाशांच्या हितासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या नव्या सुविधेअंतर्गत आता प्रवाशांची एक चिंताच मिटणार आहे. प्रवासादरम्यान स्मार्टफोन किंवा तत्सम कोणतीही गोष्ट गहाळ झाल्यावर चिंतेत भर पडणं स्वाभाविक असलं तरीही आता मात्र ही चिंता मिटणार आहे. 

रेल्वेमध्ये सहसा एखादी वस्तू हरवली किंवा गहाळ झाली, तर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सतत रेल्वे स्थानकाचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा तर, इतकं सारं करूनही गेलेलं सामान काही परत मिळत नाही. आता मात्र हा मनस्ताप कमी होणार आहे. 

हेसुद्धा वाचा : पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदा 

भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे विभागाकडून नुकतच एक ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून प्रवाशांना त्यांच्या हरवलेल्या सामानाची माहिती मिळणार आहे. 'ऑपरेशन अमानत' नावाच्या या उपक्रमाअंतर्गत RPF कर्मचारी हरवलेल्या सामानाचे फोटो ताढून त्यांच्या डिव्हिजनकडे सोपवतात. यामध्ये मुंबई सेंट्रल डिवीजन, वड़ोदरा डिवीजन, अहमदाबाद डिव्हिजन, रतलाम डिव्हिजन, राजकोट डिव्हिजन, भावनगर डिव्हिजन अशा तुकड्यांमध्ये प्रभागांची विभागणी करण्यात आली आहे. 

हरवलेलं सामान परत मिळवण्यासाठी नेमकं काय करावं? 

  • हरवलेलं सामान परत मिळवण्यासाठी सर्वप्रथम  https://wr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,2,753 या संकेतस्थळाला भेट द्यावी. 
  • यानंतर तुम्हाला तुमच्या नजीकच्या डिव्हीजन ऑफिसला भेट द्यावी लागेल. 
  • डिव्हीजन ऑफिसला जाताच तुम्हाला सामानाची सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीनं मिळू शकेल. जिथं सामान कधी हरवलं आहे आणि कुठे सुपूर्द करण्यात आलं आहे याबाबतची माहिती समोर येईल. 
  • हरवलेल्या सामानाची किंमत, त्याच्या लिलावासंदर्भातली माहितीसुद्धा या पोर्टलवर मिळू शकणार आहे.

प्रवाशांसाठी हे पोर्टल म्हणजे एक मोठा दिलासा ठरत आहे, असंच म्हणावं लागेल.