Indian Railway | आता QR कोड स्कॅन करून खरेदी करता येणार तिकिट; वाचा डिटेल्स

भारतीय रेल्वेने ATVM (ATVM- Automatic Ticket Vending Machine) द्वारे प्रदान केलेल्या सर्व सुविधांसाठी डिजिटल पेमेंट अधिकृत केले आहे. 

Updated: May 26, 2022, 11:59 AM IST
Indian Railway | आता QR कोड स्कॅन करून खरेदी करता येणार तिकिट; वाचा डिटेल्स title=

 

मुंबई : पेटीएम, फोनपे, फ्रीचार्ज यांसारख्या UPI आधारित मोबाइल अॅप्सवरून क्यूआर कोड स्कॅन करून प्रवासी तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि मासिक पास मासिक पासच्या नूतनीकरणासाठी डिजिटल पेमेंट करू शकतात. उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कॅप्टन शशी किरण यांच्या म्हणण्यानुसार, यासाठी रेल्वे स्थानकांवर बसवलेल्या ATVM मध्ये सर्व सेवांसाठी UPI QR कोडची व्यवस्था करण्यात आली आहे. क्यूआर कोड स्कॅन करून, प्रवाशी फोनद्वारे डिजिटल पेमेंट करून तिकीट मिळवू शकतात. याशिवाय प्रवासी AVTM स्मार्ट कार्ड रिचार्ज करण्यासाठी देखील याचा वापर करू शकतात.

प्रवाशांना मिळणार अनेक सुविधा 

कॅप्टन शशी किरण म्हणाले की, अनारक्षित तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि मासिक सीझन तिकिटांचे नूतनीकरण करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट सुविधेमुळे एकीकडे प्रवाशांची स्थानकांवरच्या लांबलचक रांगांपासून सुटका झाली आहे. तर दुसरीकडे पैसे भरण्याची सुविधा सुलभ आणि सुरक्षित झाली आहे. सर्व रेल्वे ग्राहकांनी ऑनलाईन डिजिटल पेमेंटचा अधिकाधिक वापर करून सुविधेचा लाभ घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन भारतीय रेल्वेच्या विविध झोनने देशातील अनेक रेल्वे स्थानकांवर एटीव्हीएम मशीन बसवल्या आहेत आणि त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. भारतीय रेल्वे सध्या त्या रेल्वे स्थानकांवर एटीव्हीएम बसवत आहे, जिथे प्रवाशांची संख्या जास्त आहे.