मुंबई : Indian Railways: तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कोणत्याही कारणामुळे तुम्हाला ट्रेनचा चार्ट तयार झाल्यानंतर तिकीट रद्द करावे लागले. तरीही तुम्ही रिफंडसाठी दावा करू शकता. अशावेळी तुम्हाला तिकीट रद्द केल्याच परतावा मिळेल.
IRCTC ने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आणि म्हटले की तिकीट काढल्यानंतरही रेल्वेने प्रवास न केल्यास किंवा अर्ध्यावर प्रवास सोडल्यास तिकीट रद्द करता येते आणि त्याचे पैसे परत मिळवता येतात. तुम्हाला रेल्वेच्या नियमांनुसार तिकीट जमा पावती (TDR)जमा करावी लागेल.