खुशखबर ! प्रवाशांच्या विरंगुळ्यासाठी रेल्वेतर्फे मोठी सुविधा

 रेल्वे प्रवासात या सुविधेसाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. 

Updated: Jan 2, 2020, 05:21 PM IST
खुशखबर ! प्रवाशांच्या विरंगुळ्यासाठी रेल्वेतर्फे मोठी सुविधा  title=

नवी दिल्ली : रेल्वेतील मोठा प्रवास प्रवाशांना आता कंटाळवाणा वाटणार नाही. रेल्वेच्या प्रवासादरम्यान प्रवाशांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. भारतीय रेल्वेच्या पीएसयू रेलटेल यासाठी कंटेट ऑन पीएसयू रेलटेल (RailTel)ने यासाठी कंटेट ऑन डिमांड ही सुविधा सुरु केली आहे. यानुसार लवकरच तुम्ही रेल्वेमध्ये आपल्या आवडीचा सिनेमा, सिरियल, गाणी किंवा भक्ती संगीताशी संबंधित कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकणार आहात.

सर्वात महत्वाचं म्हणजे रेल्वे प्रवासात या सुविधेसाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. तुमचा मोबाईल, लॅपटॉप किंवा आयपॅडचा डेटा देखील खर्च होणार नाही आहे. ही सुविधा मोफत असणार आहे. रेलटेलने या सुविधेसाठी टेंडर उघडले आहेत. यावर बोली लावली जात आहे. हे काम एका महिन्याच्या आत पूर्ण केले जाणार आहे. येणाऱ्या काळात ही सुविधा देशातील प्रत्येक रेल्वेत सुरु होणार आहे. 

सुरुवातीला ही सुविधा ४ तासांपेक्षा जास्त अंतरावर असणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये सुरु होईल. त्यानंतर सर्व रेल्वे गाड्यांमध्ये ही सुविधा दिसेल. सध्या रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना हाय स्पीड इंटरनेट मिळत नाही. त्यामुळे प्रवासी आपल्या मोबाईल फोनचा उपयोग चांगल्या रितीने करु शकत नाहीत. 

नववर्षात दरवाढ 

एका किलोमीटरसाठी १ पैसा अशी ही दरवाढ आहे.  नॉन एसी / बिना वातानुकूलित डब्याच्या तिकीट दरात एका किलोमीटरसाठी २ पैसे, तसंच एसी डब्याच्या/ वातानुकूलित डब्याच्या तिकीट दरात एका किलोमीटरसाठी ४ पैसे अशी ही दरवाढ असणार आहे. शताब्दी आणि राजधानी एक्स्प्रेस गाड्यांसाठी सुद्धा ही दरवाढ लागू असणार आहे. मात्र रिझर्वेशन चार्ज आणि सुपरफास्ट चार्जमध्ये कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. सोबतच लोकल आणि उपनगरीय रेल्वेच्या भाड्यामध्ये मात्र कोणतीही वाढ होणार नसल्याचं कळत आहे.