Indian Railways : ऐतिहासिक निर्णय! भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मिळणार अपेक्षेपलीकडील सुविधा

Indian Railways : प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं घेतलेला हा निर्णय आणि रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सेवेचा तुम्हालाही फायदा मिळणार आहे. आता ही सुविधा काय हे एकदा पाहाच...   

Updated: Feb 23, 2023, 03:16 PM IST
Indian Railways : ऐतिहासिक निर्णय! भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मिळणार अपेक्षेपलीकडील सुविधा title=
Indian Railways to provide 70 food items during journey made in pantry itself Latest Marathi News

Indian Railways Latest News : (Indian Railway) भारतीय रेल्वे.... प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी सतत तत्पर असणारं एक साधन. इतक्या वर्षांपासून प्रवाशांना सेवा पुरवणाऱ्या भारतीय रेल्वेनं काळानुरूप आणि प्रत्येक नव्या तंत्राज्ञानाला अनुसरून आपल्या सेवांमध्येही काही महत्त्वाचे बदल केले. असं असतानाच रेल्वेच्या काही सुविधांबाबत मात्र प्रवासी आजही नाराजीचा सूर आळवताना दिसतात. पण, आता त्या तक्रारीही नाहीशा होण्याच्या मार्गावर आहेत. कारण, आता ज्याची अपेक्षाही नव्हती अशीच सुविधा रेल्वे सुरु करण्याच्या विचारात आहे.  

रेल्वेमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांविषयी तक्रारीचा सूर.... (Railway Food)

गेल्या काही दिवसांपासून रेल्वेशीच संलग्न असणाऱ्या आयआरसीटीसी (IRCTC)कडून गेल्या काही दिवसांपासून रेल्वेमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर आणि त्यांच्या Quality वर काम केलं जात आहे. ज्यामुळं आता तुम्हालाही प्रवासादरम्यान चांगल्या पद्धतीचा (Samosa) समोसा, इडली (Idli), ब्रेड बटर, ढोकला, पोहे इथपासून बर्गरपर्यंतचे पदार्थ खाण्याची संधी मिळणार आहे. 

कोरोना काळादरम्यान थांबवण्यात आलेली ही सुविधा (Corona Period)

मार्च 2020 मध्ये कोरोनाची लाट येण्याआधी विविध मार्गांवर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये पनीर पकोडा, ब्रेड पकोडा आणि अशा अनेक पदार्थांना रेल्वेच्याच पँट्रीमध्ये तयार केलं जात होतं. रेल्वेकडून या पद्धतीला a-la-carte असं म्हटलं जात होतं. पण, कोरोनाचं सावट आलं आणि ही सुविधा बंद झाली. पण, आता मात्र ती पूर्ववत होणार आहे. रेल्वे बोर्डाकडून परवानगी मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

आतापर्यंत राजधानी एक्‍सप्रेस (Rajdhani Express), शताब्दी एक्‍सप्रेस (Shatabdi Express) आणि वंदे भारत (Vande Bharat Express) यांसारख्या रेल्वे वगळता इतर गाड्यांमध्ये येणाऱ्या पदार्थांना प्रवासी पसंती देत नव्हते. पण, आता मात्र हे चित्र बदलणार आहे. 

पदार्थ आणि त्यांचे दर खालीलप्रमाणे... 

चपाती - 10 रुपये 
कचोरी- 10 रुपये 
थट्टे इडली- 20 रुपये 
इडली 2 नग, चटणी/ सांभर- 20 रुपये 
ब्रेड बटर/ बटर टोस्ट 2 नग - 20 रुपये 
आलू बोंडा/सुखियान/ कोझुकट्टा 2 नग - 20 रुपये 
समोसा 2 नग - 20 रुपये 
मेदु वडा 2 नग -  20 रुपये 
गरम/ थंड दूध - 20 रुपये 
मसाला / डाळ वडा 2 नग- 30 रुपये 

हेसुद्धा वाचा : Konkan Railway : शिमग्याला कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या; उन्हाळ्याच्या सुट्टीचंही वेळापत्रक समोर

रवा/गहू/ओट्स/ शेव उपमा- 30 रुपये 
ओनियन/ रवा उत्तपा- 30 रुपये 
दही वडा 2 नग- 30 रुपये 
ब्रेड पकोडा - 30 रुपये 
कांदा/ बटाटा/ वांग/ भाजी- 30 रुपये 
ढोकळा- 30 रुपये 
पोहे- 30 रुपये 
टोमॅटो/ व्हेज/ चिकन सूप - 30 रुपये 
शेव भाजी - 30 रुपये 
मसाला डोसा - 30 रुपये 
दहीभात - 50 रुपये 
पनीर पकोडा 2 नग - 50 रुपये 
व्हेज बर्गर - 50 रुपये 
राजमा/ छोले चावल- 50 रुपये 
सँडविच 2 नग - 50 रुपये 
व्हेज नूडल्स- 50 रुपये 
पाव भाजी (2 पाव)- 50 रुपये