Indian Railways: लग्नासाठी आता रेल्वेचा कोच बुक करू शकता, जाणून घ्या बुकिंगचे नियम

जर तुम्हाला लग्नासाठी किंवा विशेष कार्यक्रमासाठी पूर्ण डबा किंवा संपूर्ण स्पेशल रेल्वे बुक करायची असेल तर आता तुम्ही ते सहज करू शकता.  

Updated: Dec 21, 2021, 12:20 PM IST
Indian Railways: लग्नासाठी आता रेल्वेचा कोच बुक करू शकता, जाणून घ्या बुकिंगचे नियम
संग्रहित छाया

नवी दिल्ली : Indian railways:  आता लग्नासाठी रेल्वेचा कोच किंवा रेल्वे बुक करणे खूप सोपे झाले आहे. तसेच, विवाहाचा कार्यक्रम रद्द झाला असल्यास विहित कर वजा केल्यावर पैसे परत मिळू शकतात. रेल्वे तसेच कोच आरक्षण करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या.

जर तुम्हाला लग्नासाठी किंवा विशेष कार्यक्रमासाठी पूर्ण डबा किंवा संपूर्ण स्पेशल रेल्वे बुक करायची असेल तर आता तुम्ही ते सहज करू शकता. यासाठी तुम्हाला थेट आयआरसीटीसीशी संपर्क साधावा लागेल. दरवर्षी 100 हून अधिक डबे वेगवेगळ्या ट्रेनमध्ये बुक केले जातात.

यासाठी निश्चित भाड्यापेक्षा 35 ते 40 टक्के जास्त रक्कम भरावी लागणार आहे. एवढेच नाही तर त्यासाठी रेल्वेच्या खात्यात एक विशिष्ट अनामत रक्कम जमा करावी लागेल, ती रक्कम तुम्हाला नंतर परत मिळेल.

सेवा करापासून ते GST आणि इतर करांचा समावेश IRCTC द्वारे आकारलेल्या रकमेमध्ये (अतिरिक्त शुल्कांमध्ये) करण्यात आला आहे. आता कोच किंवा रेल्वे बुक करणे खूप सोपे झाले आहे. तसेच, कार्यक्रम रद्द केल्यास, विहित कर वजा केल्यावर पैसे परत मिळू शकतात.

ही आवश्यक कागदपत्रे  

यासाठी तुम्हाला आयडी पासवर्ड तयार करावा लागेल.
ज्यासाठी पडताळणी देखील आवश्यक आहे.
त्यासाठी पॅन क्रमांकही अनिवार्य आहे.
ही सर्व माहिती अपलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये OTP येईल ज्याद्वारे हे पडताळणी केली जाईल.
OTP क्रमांक टाकताच, यूजर पुढील प्रक्रियेसाठी प्रविष्ठ होतो
तसेच आधार क्रमांकही अनिवार्य आहे.

कोण-कोणते डबे लावता येतील

यासाठी रेल्वेमध्ये फर्स्ट एसी, सेकंड एसी (टी-टियर), सेकंड एसी (सेकंड सिटिंग), थर्ड एसी (थ्री टायर), एसी चेअर कार, एक्सक्लुझिव्ह चेअर कार, एसए, एचबी, सेकंड क्लास जनरल, पॅंट्रीकार, नॉन एसी सलून, एसी सलून, स्लीपर, एसएलआर, उच्च क्षमतेची पार्सल व्हॅन, जनरल आणि इतर डबे बसवता येतील.

किती पैसे जमा करावे लागतील?

एका कोचसाठी - 50 हजार रुपये
18 डब्यांच्या ट्रेनसाठी - 9 लाख रुपये
हॉल्टिंग चार्ज - 07 दिवसांनंतर 10 हजार रुपये प्रति कोच अतिरिक्त

नियम आणि अटी जाणून घ्या

तुम्ही जी ट्रेन बुक कराल तिला 18 ते 24 डबे असतील. ट्रेनमध्ये तीन एसएलआर कोच आवश्यक आहेत. तुम्ही कमी डबे घेतले तरीही तुम्हाला 18 डब्यांच्या बरोबरीने अनामत रक्कम द्यावी लागेल. यासाठी तुम्हाला 1 ते 6 महिने अगोदर बुकिंग करावे लागेल. तुम्ही बुकिंगच्या तारखेच्या दोन दिवस आधी बुकिंग रद्द करू शकता. ट्रेन कोणत्याही स्थानकावर 10 मिनिटांपेक्षा जास्त थांबणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की ट्रेनमध्ये दोन स्लीपर कोच देखील अनिवार्य आहेत.

असे बुकिंग करू शकता

तुम्हालाही संपूर्ण रेल्वे किंवा कोच बुक करायचा असेल तर तुम्ही IRCTC वेबसाइटवर जा.
आता FTR सेवेवर जा.
- आयडी पासवर्ड वापरून त्याला लॉग इन करा.
येथे विचारलेली सर्व माहिती भरा.
तारीख आणि इतर माहिती भरल्यानंतर ऑनलाइन पेमेंट करा.