मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी कामाची बातमी आहे. ट्रेनने प्रवास करण्यासाठी, तुम्हाला महिन्यापूर्वी आरक्षण करणे गरजेचे असते. अचानक काही कामानिमित्त प्रवास करण्याची गरज पडली तर, विना तिकिटमुळे आपली तारांबळ उडते, अन् अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत लोकांना फक्त तत्काळ तिकीट बुकिंग नियमांचा पर्याय माहित आहे. पण, आज आम्ही तुम्हाला आणखी एक पर्याय सांगणार आहोत.
जर तुमच्याकडे रिजर्वेशन तिकिट नसेल आणि तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढू शकता. त्यानंतर तिकीट तपासनीसकडे जाऊन तुम्ही तिकिटे सहज मिळवू शकता. हा नियम रेल्वेनेच केला आहे.
प्लॅटफॉर्म तिकिटावर चढणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब TTE शी संपर्क साधावा लागेल आणि त्याला ज्या ठिकाणी जायचे आहे त्याचे तिकीट मिळवावे लागेल.
काही वेळा जागा रिक्त नसल्यास TTE तुम्हाला आरक्षित जागा देण्यास नकार देऊ शकते. पण, प्रवास थांबवू शकत नाही.
जर तुमच्याकडे आरक्षण नसेल तर अशा परिस्थितीत प्रवाशाकडून 250 रुपये दंड आणि प्रवास भाडे आकारले जाईल. रेल्वेचे हे महत्त्वाचे नियम जे तुम्हाला प्रवासापूर्वी माहित असणे आवश्यक आहे.
प्लॅटफॉर्म तिकीट प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याचा अधिकार देते. त्यामुळे प्रवाशाने ज्या स्थानकातून प्लॅटफॉर्म तिकीट काढले आहे त्याच स्थानकावरून भाडे भरावे लागणार आहे. भाडे आकारताना, प्रवास संपण्याचे स्थानक देखील तेच स्थानक मानले जाते.