कोरोना: देशात 24 तासात तब्बल 89,706 नवीन रुग्णांची वाढ, 1115 रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोनाचा कहर सुरुच...

Updated: Sep 9, 2020, 10:33 AM IST
कोरोना: देशात 24 तासात तब्बल 89,706 नवीन रुग्णांची वाढ, 1115 रुग्णांचा मृत्यू title=

मुंबई : गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 89,706 नवीन रुग्ण वाढले आहेत. तर 1115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. देशातील 43.7 लाख लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत देशात 73,890 लोकांनी आपला जीव गमावला आहे. भारतात कोरोनाचे 8,97,394 रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत जवळपास 34 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 

भारतातील 5 राज्यात 20 पेक्षा कमी लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, 11 अशी राज्ये आहेत जिथे 1000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी सकाळची आकडेवारी

आतापर्यंत देशात कोरोना रूग्णांची एकूण संख्या - 43,70,129
आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृतांची संख्या - 73,890
आतापर्यंत देशात बरा झालेल्या रूग्णांची संख्या - 33,98,845
गेल्या 24 तासात नवीन कोरोना रुग्णांची संख्या - 89,706
गेल्या 24 तासात मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या - 1,115
देशात एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या - 8,97,394