भारताच्या सर्जिकल स्ट्राईकची पाकिस्तानाच्या लष्करी हेडक्वार्टरमध्ये दहशत

भारताच्या या सर्जिकल स्ट्राईकची पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांमध्ये प्रचंड दहशत आहे.

Updated: Dec 22, 2020, 07:24 PM IST
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकची पाकिस्तानाच्या लष्करी हेडक्वार्टरमध्ये दहशत title=

नवी दिल्ली : पाकिस्तानची नांगी ठेचण्यासाठी भारतानं पाकिस्तानच्या भूमीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केले. भारताच्या या सर्जिकल स्ट्राईकची पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांमध्ये प्रचंड दहशत आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दहशत आहे. रावळपिंडीच्या लष्करी हेडक्वार्टरमध्ये ही प्रंचड दहशत आहे. साहिवालपासून सिंधपर्यंत दहशत आहे. ही दहशत आहे नव्या भारताच्या नव्या बाण्याची...

भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला 1 हजार 546 दिवस उलटलेत. पण या सर्जिकल स्ट्राईकची दहशत अजूनही पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या मनात तेवढीच आहे जेवढी पहिल्या दिवशी होती.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्यातून ते वारंवार जाणवतं. आंतरराष्ट्रीय समुदायासमोर स्पष्ट करतो की भारत पाकिस्तानविरोधात बोगस सर्जिकल स्ट्राईक करत असेल तर पाकिस्तानही शांत बसणार नाही. भारताला प्रत्येक आघाडीवर आम्ही प्रत्युत्तर देऊ अशी दर्पोक्ती इम्रान खान यांनी ट्विटरवर केली आहे. भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करेल अशी भीती वारंवार पाकिस्तानी नेते बोलून दाखवतायत. त्यांच्या वक्तव्यातून वारंवार ही भीती जाणवते आहे.

भारतानं दोनदा सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला आणि कुरापतखोर चीनलाही इशारा दिला आहे. पुन्हा भारताच्या वाट्याला जाल तर तुम्हाला सडेतोड उत्तर मिळेल, हा संदेश पाकिस्तान आणि चीनपर्यंत पोहचला आहे.