indiavschina : पाहा संघर्षाच्या काळात भारतीय वायुदलाच्या हवाई साहसाची झलक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला भेट दिल्यानंतर.... 

Updated: Jul 5, 2020, 10:33 AM IST
indiavschina : पाहा संघर्षाच्या काळात भारतीय वायुदलाच्या हवाई साहसाची झलक
छाया सौजन्य- एएनआय

नवी दिल्ली : India भारत आणि China चीन indiavschina  या दोन्ही राष्ट्रांमध्ये सुरु असणाऱ्या तणावग्रस्त परिस्थितीमध्ये भारताकडूनही सीमा भागामध्ये सैन्यदलाकडून शस्त्रसाठा आणि अत्याधुनिक युद्धप्रणालीने परिपूर्ण असणारी लढाऊ विमानं सज्ज ठेवण्यात येत आहेत. यातच आता भारताकडून लडाखमध्ये वायुदलानं नवं हवाई तळ कार्यान्वित केल्याची माहिती आहे. जेथून Indian Air Force वायुदलातील लढाऊ विमान सुखोई 30, एमकेआय आणि मिग 29 या विमानांनी उड्डाणही भरलं. थोडक्यात सीमा भागात लढाऊ विमानांच्या सॉर्टी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला भेट दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारती वायुदलाच्या लढाऊ विमानांचं हे अभ्यासू उड्डाण चीनना झास्तावणारं आहे असं म्हणायला हरकत नाही. Our Joskh is high असं म्हणत आपण कोणत्याची आवाहनासाठी तयार असल्याचं भारतीय वायुदलातील जवानांनी सांगितलं. याच उड्डडाण्यांबाबत अधिक माहिती देत वायुदल अधिकारी म्हणाले, 'कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमच्याकडे सर्व सुसज्जता आणि व्यवस्था आहे. मनुष्यबळ असो किंवा मग शस्त्रसाठा वायुदल सर्व प्रकारची आव्हानांसाठी आणि सर्वतोपरी लष्कराच्या मदतीसाठी सज्ज आहे'. 

आणखी एका स्क्वाड्रन लीडरकडूनही याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली. आमचा उत्साह परमोच्च शिखरावरव असून कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीसाठी आमचे योद्धे तयार अल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून चीनसोबत सुरु असणाऱ्या सीमावादाला मिळालेलं तणावग्रस्त वळण पाहता त्याच पार्श्वभूमीवर भारताकडून सीमाभागात कोणत्याची बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी म्हणून सशस्त्र सैन्य तैनात करण्यात येत आहे. शिवाय या भागात हवाई गस्त घालण्याचं प्रमाणही तुलनेनं वाढवण्यात आलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच लडाखमधील पूर्व भागात असणाऱ्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये हिंसक चकमक झाली. ज्यामध्ये दोन्ही देशांतील सैन्यात कार्यरत असणाऱ्या काही जवानांना प्राण त्यागावे लागले. या संघर्षानं आधीच असणाऱ्या तणावग्रस्त परिस्थितीत भर टाकली आणि आता या समीकरणांना आणखी नवी वळणं मिळाली असून, त्याचे थेट परिणाम सीमेवर वाढत्या गंभीर आणि बिकट परिस्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत.