अवघ्या ८९९ रुपयांत विमान प्रवास करण्याची संधी

नव्या वर्षाच्या सुरुवातीला इंडिगो एअरलाईन्सने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 8, 2018, 05:28 PM IST
अवघ्या ८९९ रुपयांत विमान प्रवास करण्याची संधी title=

नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या सुरुवातीला इंडिगो एअरलाईन्सने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

इंडिगो एअरलाईन्स प्रवाशांसाठी न्यू ईयर सेल घेवून आली आहे. या सेलमधील ऑफरनुसार कंपनी केवळ ८९९ रुपयांत प्रवाशांना विमानप्रवास करण्याची संधी देत आहे.

ऑफरनुसार, १ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०१८ या कालावधीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. या ऑफरसाठी तिकीट बुकिंग ८ जानेवारी ते १० जानेवारी दरम्यान करावी लागणार आहे. इंडिगोची ही ऑफर डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणांसाठी लागू असणार आहे.

मिळणार मोठा लाभ

स्वस्त तिकीटासोबतच प्रवाशांना १० टक्क्यांचं अतिरिक्त कॅशबॅक आणि एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ६०० रुपयांचं इंडिगो स्पेशल सर्व्हिस कूपन मिळणार आहे.

या मार्गावर मिळणार स्वस्त तिकीट

दिल्लीहून चंडीगढसाठी सुरुवातीचं तिकिट ८९९ रुपये, दिल्ली ते जयपूरसाठी ९९९ रुपये, मुंबई ते बंगळुरुसाठी कमीतकमी १३९९ रुपये तर, मुंबई ते चेन्नई या प्रवासासाठी १४९९ रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. यासोबतच बँकॉक ते कोलकातासाठी ४०९९ रुपये आणि दुबई ते दिल्ली या प्रवासासाठी ५२९९ रुपये द्यावे लागणार आहेत.

तिरुपतीसाठीही नवी उड्डाण सेवा

इंडिगोने आपलं रिजनल नेटवर्क वाढवत तिरुपतीसाठी नवी उड्डाण सेवा सुरु केली आहे. आता हैदराबादहून तिरुपतीसाठी दररोज ३ नॉन स्टॉप फ्लाईट्स असणार आहेत. यासोबतच तिरुपतीहून दिल्ली, मुंबई, कोलकाता, दुबई आणि सिंगापूर या शहरांतही इंडिगोची सेवा मिळणार आहे.