अवघ्या ९९९ रूपयात इंडिगोसोबत करा विमानप्रवास

यंदा नववर्ष आणि ख्रिस्मस हे विकेन्डला जोडून आल्याने या सुट्ट्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेक जणांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला असेल. 

Updated: Dec 19, 2017, 05:09 PM IST
अवघ्या ९९९ रूपयात इंडिगोसोबत करा विमानप्रवास  title=

मुंबई : यंदा नववर्ष आणि ख्रिस्मस हे विकेन्डला जोडून आल्याने या सुट्ट्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेक जणांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला असेल. 

तुम्ही आयत्या वेळेस प्लॅन करणार असाल तर तुम्हांला साधारण रेल्वेच्या तिकिटाच्या दरा इतकेच विमानाचे तिकीट मिळणार आहे. कारण इंडिगोने नववर्षाच्या काळामध्ये खास ऑफरची घोषणा केली आहे. 

इंडिगो भारतातील काही विमानप्रवासाच्या मार्गावर ही खास सूट देणार आहे.  

सर्वात कमी म्हणजे केवळ ९९९ रूपयांपासून ही तिकिटांची किंमत सुरू  होणार आहे. 

पहा काय आहेत विमानप्रवासाचे खास दर  

दिल्ली -जयपूर :  999 रूपये 

बांगडोंगरा- गुहावटी : Rs 1005  रूपये 

कोंईबतूर - चैन्नई  :  1095 रूपये 

जम्मू -श्रीनगर : 1112 रूपये 

चैन्नई - बेंगलोर :  1120 रूपये 

आगरतळा -गुवाहटी :  1130 रूपये 

चैन्नई - कोईंबतुर :1148 रूपये 

कोची - चेन्नई : 1212 रूपये 

विशाखापट्टणम - हैदराबाद :  1259 रूपये 

पटणा - कोलकत्ता : 1264  रूपये 

उडे देश का आम आदमी या सरकारच्या धोरणानुसार तासाभराच्या प्रवासाला २५०० हून अधिक रूपये आकारले जाऊ शकत नाहीत.