शुभीच्या स्टाईलनं वाहतुकीला शिस्त

शुभी जैन, इंदूरची ट्रॅफिक सुंदरी

Updated: Nov 19, 2019, 11:33 PM IST
शुभीच्या स्टाईलनं वाहतुकीला शिस्त  title=

इंदूर : मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरातल्या हायकोर्ट चौकात वाहतूक सुंदरी सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली. पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये शिकणारी शुभी जैन तिच्या खास शैलीत वाहतूक नियंत्रित करते. बाईकवर विनाहेल्मेट जाणाऱ्यांना ती हेल्मेट घालण्य़ाचा सल्लाही देते. नो एंट्रीमध्ये घुसणाऱ्यांनाही ती तिच्या स्टाईलने थांबवते. विद्यूतवेगानं तिच्या हालचाली पाहण्यासारख्या आहेत. सिटबेल्ट लावलेल्या कारचालकांना ती धन्यवादही देताना दिसते. 

या सगळ्यात तिची हटके स्टाईल लक्ष्यवेधी ठरली आहे. शुभी जैन इंटर्नशिपसाठी इंदूरमध्ये आली होती. तिनं रेल्वे स्टेशनबाहेर शाळकरी मुलांना ट्रॅफिक नियंत्रित करताना पाहिलं. शाळकरी मुलांना पाहूनच तिला या उपक्रमात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाल्याचं शुभी सांगते.

सध्या सर्वत्र वाहतूक कोंडीची समस्या डोकंवर काढत आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहने चालवणे देखील जिकरीचं झाले आहे. त्याचप्रमाणे दिवसागणिक वाहनांचे प्रमाणदेखील वाढताना दिसत आहे.