मुंबई : गाडी चालवणं हे जोखमीचं काम आहे. यासाठी आपल्याला सगळीकडे निट लक्ष ठेवावे लागते. कारण जर आपल्या हातून एक जरी चुक झाली तर ती आपल्याला महागात पडू शकते. अनेकदा गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे देखील रस्त्यावर अपघात घडतात. ज्यामुळे बऱ्याच चालकाच्या मनात ही भीती असते की, जर माझ्या गाडीचं ब्रेक फेल झालं तर? परंतु अशा परिस्थितीत घाबरुन जाऊ नका. योग्य तो पर्यायांचा वापर करा ज्यामुळे तुम्ही मोठी घटना होण्यापासून थांबवू शकता.
आज आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे देखील गाडी नियंत्रणात ठेऊन थांबवू शकता.
जेव्हा कारचे ब्रेक फेल होतात, त्याआधी आपल्याला गाडीकरुन काही चिन्हे किंवा हिन्ट मिळतात. जसे की ब्रेक पॅडमधून ब्रेक लावताना आवाज येणे. कधीकधी ब्रेक जाम होऊ लागतात. अचानक ब्रेकची वायर तुटते किंवा मास्टर सिलेंडर गळू लागते आणि ब्रेकला आवश्यक दाब मिळत नाही. ब्रेक इंधन गळती देखील ब्रेक निकामी सूचित करते.
त्यामुळे जेव्हा तुम्हाला असे संकेत मिळतील तेव्हा वेळीच गाडी रिपेअर करा आणि काळजी घ्या.
सर्व प्रथम, कारचा वेग कमी करून त्यावर नियंत्रण ठेवा आणि ब्रेक पेडलवर वारंवार दाबा. असे अनेक वेळा केल्याने ब्रेकला योग्य दाब येतो आणि ब्रेक पुन्हा काम करू लागतात. जर तुमची गाडी टॉप गिअरमध्ये चालत असेल तर ती लोअर गिअरमध्ये आणा. परंतु गाडीला लगेच लोअर गेअरला आणू नका. यामुळे गाडीचं नियंत्रण सुटेल. त्याचा एक-एक गेअर हळूहळू कमी करा, ज्यामुळे गाडी नियंत्रणात येईल.
चुकूनही गाडी रिव्हर्स गिअरमध्ये टाकू नका , असे केल्याने मागून येणाऱ्या वाहनाने अपघात होण्याची शक्यता आहे. एक्सीलरेटर अजिबात वापरू नका, तुम्ही फक्त क्लच वापरा.
तज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीत वाहनाची एअर कंडिशन चालू करा. यामुळे इंजिनवरील दाब वाढेल आणि वेग किंचित कमी होईल.
हेडलाइट्स लावल्याने बॅटरीचा पॉवर सप्लाय कमी होऊन गाडीचा वेग कमी होईल, असेही तज्ज्ञ सुचवतात. इतरांना हॉर्न, दिवे, इंडिकेटर आणि हेडलॅम्प-डिपरसह सूचना देखील मिळते. ज्यामुळे धोका कमी होईल.
जर तुमच्या जवळपास वाळू किंवा चिखल असल्यास, स्टीयरिंग व्हील नियंत्रित करा आणि वाळू किंवा खडीवरून वाहन चालवा. यामुळे कारचा वेग लक्षणीयरीत्या कमी होईल. ज्यानंतर हँडब्रेकचा योग्य प्रकारे वापर करा मॅन्युअल हँडब्रेकसह कारमध्ये गीअर्स बदलताना हलका हँडब्रेक वापरा.