सोनं-चांदी नाही तर चक्क आईच्या दुधाचा दागिना, पाहा फोटो

आईच्या दुधाच स्मरण राहावं यासाठी अनेकांनी बरेच वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या असतील.

Updated: Jan 13, 2022, 08:24 PM IST
सोनं-चांदी नाही तर चक्क आईच्या दुधाचा दागिना, पाहा फोटो title=

मुंबई : आईच्या दुधाचं मोल कोणतही मुल कधीच चुकवू शकत नाही. याच आईच्या दुधाच स्मरण राहावं यासाठी अनेकांनी बरेच वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या असतील, कुणी आईच मंदीर बनवत तर कुणी स्मारक, परंतू आता आईच्या दुधाचं आयुष्यभर स्मरण राहण्यासाठी आईच्या दुधापासून बनवलेले दागिने हा एक नवा प्रयोग करण्यात आला आहे.  केवळ पाश्चिमात्य देशातच नाही तर आपल्या भारतातसुद्धा अशा दागिन्यांची मागणी वाढत आहे.

न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या अलीमाने  तिच्या मुलीसाठी हा दागिना बनवायचा ठरवलं तिने तिच 10 मिलीलीटर दूध 'कीपसेक बाय ग्रेस' नावाच्या कंपनीला पाठवले आणि एका महिन्यानंतर, तिला दुधाळ-पांढऱ्या रंगाचा हृदयाच्या आकाराचं पेंडल नेकलेस मिळालं. आपल्या स्तनपानाचा प्रवास लक्षात ठेवण्यासाठी अलीमाने  हा दागिना मागवला होता.

कीपसेक बाय ग्रेसची मालकीण साराह कॅस्टिलो सांगतात की "माझ्या अनेक ऑर्डर अशा क्लायंटकडून येतात ज्यांना एकतर कठीण परिस्थितीतून जाव लागलय किंवा आपल्या मुलाला काही कारणास्तव स्तनपान करू शकले नाहीत. या दागिन्यांना भरपूर मागणी आहे. याची किंमत साधारणपणे $60 ते $150 असते."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

भारतामध्येही आईच्या दुधाच्या दागिन्यांना मागणी

भारतात प्रीती नावाची एक चेन्नई-स्थित कलाकार आहे. ती हे दागिने बनवते. प्रीतीच्या दागिन्यांमध्ये कानातले, अंगठी, पेंडंटसह इतर गोष्टींचा समावेश आहे. फेसबुक फोरमवर या दागिन्याची जबरदस्त मागणी आहे आणि तेच विचारात घेत तिला ही कल्पना सूचली.

प्रीतीच्या या दागिन्यांची किंमत 1 हजार रुपयांपासून 4 हजार रुपयांपर्यंत आहे, जे त्याची डिझाइन आणि मटेरियलवरती अवलंबून आहे. आजवर प्रितीने अनेक दागिने बनवले आहेत. आता तिला सोशल साईट्सवर फक्त आईच्या दूधाचेच नाही, तर मुलाचा पहिला दात, केस आणि अगदी नाळ यांसारख्या गोष्टी बनवण्यासाठी अनेकांनी रिक्वेस्ट केली आहे.