मुंबई : पैसे मिळवण्यासाठी लोक अनेक मार्ग वापरतात. तसेच अनेक लोक हे असलेल्या पैशांवर जास्तीचे रिटर्न्स मिळवण्यासाठी वेगवेगल्या स्कीममध्ये किंवा बँकेत पैसे गुंतवतात. तसे पाहाता गुंतवणुकीसाठी विविध माध्यम उपलब्ध आहेत. यातील काही गुंतवणुक या जोखमीच्या असतात, तर काही गुंतवणूक सुरक्षित असतात. त्याच वेळी, अनेक लोक म्युच्युअल फंडचा मार्ग देखील अवलंबतात. परंतु अनेक लोक हे कोणाच्या तरी सांगण्यावरुन यामध्ये पैसे गुंतवणूकीचा पर्याय अवलंबतात.
परंतु हे लक्षात घ्या की, नाही म्हटलं तरी म्युच्युअल फंडमध्ये रिस्क आहे आणि त्यामुळे येथे गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे गरजेचं आहे.
तुम्ही तर हे ऐकलंच असेल की, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात, परंतु त्यांना त्याचे तोटे माहित नाहीत. अशा परिस्थितीत, म्युच्युअल फंडाच्या तोट्यांबद्दल देखील जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक करणे अत्यंत जोखमीचे मानले जाते. त्याच वेळी, म्युच्युअल फंड देखील शेअर बाजाराशी जोडलेले आहे. यामध्ये काही स्टॉक्स मिसळून एक फंड तयार केला जातो आणि त्याच्या तुलनेत परतावा मिळतो.
म्युच्युअल फंडाचे फायदे असले तरी त्याचे काही तोटेही आहेत. अशा वेळी या गैरसोयींकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नये. या नुकसानीकडे लक्ष न दिल्यास शेवटी नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. हे टाळण्यासाठी प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे.
-परताव्याची हमी नाही.
- म्युच्युअल फंडाची लागत.
-एक्झिट लोड.
- लॉक इन कालावधी.
-परताव्यावर कर.
-निधीवर नियंत्रण नसणे.
-थेट गुंतवणुकीमुळे नुकसान होण्याची भीती.
-योजना निवडण्यात चूक.
अशा परिस्थितीत, कोणतेही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना आंधळेपणाने गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकते. म्युच्युअल फंडाचे तोटे जाणून घेऊन आणि तुमची गरज समजून घेऊन, एखाद्याने गुंतवणूक केली पाहिजे जेणेकरून कोणत्याही प्रकारचे नुकसान अगोदरच कळेल आणि ते टाळता येईल.