तुमच्या मोबाईलवरही आलाय Emergency alert ? इस्रायल- पॅलेस्टाईन युद्धात आता हे नवं काय?

Emergency alert: तंत्रज्ञान इतकं पुढे आलं की पाहता पाहता पाहता याच तंत्राचा वापर करत आता आपत्तीच्या अनुषंगानंही नागरिकांना सतर्क केलं जात आहे.   

सायली पाटील | Updated: Oct 10, 2023, 01:28 PM IST
तुमच्या मोबाईलवरही आलाय Emergency alert ? इस्रायल- पॅलेस्टाईन युद्धात आता हे नवं काय?  title=
iphone users got Emergency alert Messsgae after android israel palestine war latest update

Emergency alert: संपूर्ण जगभरातून सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये सुरु असणाऱ्या हिंसक संघर्षामुळं चिंतेची लाट पाहायला मिळत आहे. हमासची क्रूरता आणि इस्रायलमध्ये सुरु असणारा नरसंहार जग तिसऱ्या युद्धाच्या दिशेनं जात तर नाहीये ना? हाच प्रश्न वारंवार उपस्थित करत आहे. त्यातच आता भारतात अनेकांच्याच मोबाईलवर Emergency alert अशा आशयाचे मेसेज आल्यामुळं अनेकांमध्येच खळबळ माजल्याचं पाहायला मिळतेय. तुम्हालाही असा मेसेज आलाय का? आता पुढे काय करावं? 

घाबरून जाऊ नका. तुमच्या मोबाईलवर आलेला हा मेसेज आणि इस्रायल- पॅलेस्टाईन युद्धाचा थेट संबंध नसून, हा निव्वळ योगायोग आहे. काही दिवसांपूर्वीच असाच एक मेसेज अँड्रॉईड मोबाईल वापरणाऱ्यांना मिळाला होता आणि आता तोच मेसेज आयफोन (iPhone) युजर्सना आला आहे. या माध्यमातून भारत सरकारच्या वतीनं Emergency alert प्रणालीची चाचणी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. एक मोठा बीsssप आवाज होऊन हा मेसेज येतोय. 

हेसुद्धा वाचा : ओ हो हो...Royal Enfield च्या बहुप्रतिक्षित Himalayan 452 ची पहिली झलक पाहिली? 

 

Emergency Alert: Severe असं या मेसेजमध्ये ठळक शब्दांमध्ये लिहिल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशातील अनेक आयफोन धारकांना हा मेसेज पाठवण्यात आला असून, राष्ट्रीय आपत्कालीन विभागाकडून तो पाठवण्यात येत आहे. त्यामुळं तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर घाबरून जाऊ नका. या मेसेजकडे दुर्लक्ष करा. कारण, मेसेज व्यवस्थित वाचला असता तुमच्याही लक्षात येईल की, तो एक test मेसेज असून, तुम्ही तो Ignore करणं अपेक्षित आहे. 

या मेसेजमागचा हेतू काय? 

सध्या जरी हा एक टेस्ट मेसेज असला तरीही भविष्यात तो राष्ट्रीय तत्त्वाचवर देशातील नागरिकांना सतर्क करण्यासाठी वापरात आणला जाऊ शकतो. तुम्ही राहता त्या ठिकाणी वादळ आलं, किंवा येण्याची शक्यता आहे अशी परिस्थिती उदभवल्यास केंद्रीय यंत्रणा याच मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला सतर्क करण्याचं काम करतील. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचलण्यापासून शक्य ते सर्व प्रयत्न या एका मेसेजनं शक्य होणार आहेत.