का म्हटलं जातं इंंदिरा गांधींना 'आयर्न लेडी'

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि 'आयर्न लेडी' अशी ओळख असणाऱ्या इंदिरा गांधी यांची आज शंभरावी जयंती.

Updated: Nov 19, 2017, 11:08 AM IST
का म्हटलं जातं इंंदिरा गांधींना 'आयर्न लेडी' title=

नवी दिल्ली : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि 'आयर्न लेडी' अशी ओळख असणाऱ्या इंदिरा गांधी यांची आज शंभरावी जयंती. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी इंदिरा गांधी यांच्या शक्तीस्थळ या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. 

देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन

इंदिरा गांधी यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दृढ आत्मविश्वास आणि ठोस निर्णय घेण्याची क्षमता यामुळे इंदिरा गांधी लोकप्रिय नेत्या बनल्या. 

बांग्लादेशच्या उभारणीवेळी महत्वाची भूमिका

बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनवण्याचा त्यांचा निर्णय देशाला प्रगतीपथावर नेणारा होता. इंदिरा गांधी यांनी आपले वडील पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यासह स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान दिलं. 

लालबहाद्दूर शास्त्रींच्या मंत्रिमंडळात

1959 आणि 1960 मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या. 1964 साली त्यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाली. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात त्या माहिती आणि प्रसारण मंत्री बनल्या. 

मोरारजी देसाई यांच्याशी सामना

लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या पदाच्या लढाईवेळी, त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. 355 मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या 1966 मध्ये देशाच्या त्या पाचव्या पंतप्रधान बनल्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख झाली.