Kitchen Tips in Marathi : मिठ हा अन्नाचा अविभाज्य घटक आहे. मिठाशिवाय जेवण अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे पदार्थांमध्ये मीठ नाही घातले तर जेवणाला चवच येत नाही. पण तेच मीठ चिमूटभर तरी जेवणात टाकल तर जेवण चवदार होण्यास मदत होते. पण जेवणात मिठाचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. हेच प्रमाण थोडे कमी किंवा जास्त झाले तर संपूर्ण पदार्थाची चव बिघडू शकते. म्हणजेच मीठ असणे जेवणात गरजेचे असते पण त्याचे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते. पण घाईगडबडीत आपल्याकडून मिठाचे प्रमाण जास्त होते आणि पदार्थ खारट होते. अशावेळी काय करावे ते सुचतं नाही. जर पदार्थात मीठाचे प्रमाण जास्त झाले असेलतर हे उपाय करुन बघा...
तूप- पदार्थात मीठाचे प्रमाण जास्त असेल तर त्यात 2 ते 3 चमचे तूप घाला. त्यामुळे पदार्थातील मीठाचे प्रमाण संतुलित राहिले.
लिंबाचा रस- तुम्ही बनवलेल्या भाजीत जास्त मीठ झाले तर त्यात लिंबाच्या रसाचे 4 ते 5 थेंब टाका. यामुळे मिठाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि भाज्यांची चव खराब होणार नाही.
बटाटा - जर तुम्ही रस्सा भाजी किंवा वरण बनवताना मीठ जास्त झालं तर अशावेळी बटाट्याचा वापर करा. त्यात बटाटयाचे काप टाका. बटाटा पदार्थातील मीठ शोषून घेईल, त्यामुळे त्याची चव सामान्य होईल. थोड्या वेळाने बटाटेच्या काप काढून टाका. उकडलेले बटाटे वापरणे फायदेशीर ठरेल.
वाचा: फ्रीजमध्ये अंडी, चिकन, पनीर ठेवता का? मग वाचा 'ही' महत्त्वाची माहिती..
चण्याची डाळ - भाजीमध्ये जास्त मीठ झाल्यास त्यामध्ये चण्याची डाळ घालणे फायद्याचे ठरेल. यासाठी 2 ते 3 चण्याची डाळ पाण्यात भिजत घालावी.
दही - कोणताही पदार्थ खारट झाल्यास दही वापरू शकता. त्यात 2 ते 3 चमचे दही घाला. त्यामुळे मिठाचे अतिरिक्त प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होईल.
ब्रेड- रस्सा भजीमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असल्यास त्यामध्ये ब्रेडचे तुकडे मिसळल्याने फायदा होतो. ब्रेड भाजी अतिरिक्त गोड शोषून घेते. त्यामुळे खारटपणा कमी होण्यास मदत होईल.
काजू - काजूची पेस्टही पदार्थामधील खारटपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे भाजीला वेगळी चव मिळण्याबरोबरच मिठाचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल.
पीठ (कणिक) - खाद्यपदार्थांमधील मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही पीठाचा वापर करू शकता. त्यामुळे पदार्थाचा तिखटपणा कमी होतो. यासाठी पदार्थात पिठाचे 2 ते 3 छोटे गोळे टाका. अधिक मीठम शोषून घेईल. काही वेळाने पीठाचे गोळे काढून टाका.