इस्रो आज लाँच करणार जीसॅट-7ए उपग्रह

श्रीहरिकोटात काऊंटडाऊन सुरू 

इस्रो आज लाँच करणार जीसॅट-7ए उपग्रह  title=

मुंबई : इस्त्रोने मंगळवारी आपल्या संचार उपग्रह जीसॅट-7 ला लाँच करणार असल्याच काऊंटडाऊन सुरू केला आहे. श्रीहरिकोटात असलेल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून मंगळवारी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी याच काऊंटडाऊन सुरू झालं. 

बुधवारी संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी जीएसएलवी-एफ 11 रॉकेटला घेऊन लाँच केलं जाणार आहे. इस्त्रोद्वारे निर्मित जीसॅट-7ए चे वजन 2,250 किलोग्रॅम आहे. 

हे मिशन आता आठ वर्षांच झालं आहे.  इस्त्रोने मंगळवारी सांगितलं की, मिशन रेडिनेस रिव्ह्यू कमेटी आणि लाँच ऑथरायझेशन बोर्डने काऊंटडाऊन सुरू केलं आहे. 

जीएसएलवी-एफ 11 ची हे 13 वे प्रक्षेपण आहे. सातव्यांदा हे स्वदेशी क्रायोनिक इंजिनसोबत लाँच होणार आहे. याद्वारे कू-बँडच्या संचारला उपलब्ध करून देणार आहे. 

इस्त्रोचं हे 39 वं संचार उपग्रह असून याला खासकरून भारतीय वायुसेनेला उत्तम संचार सेवा देण्याच्या उद्देशाने लाँच केलं आहे. 

तस्'€à¤µà¥€à¤°à¥‹à¤‚ में- इसरो ने श्रीहरिकोटा से एक साथ 20 सैटेलाइट्स का किया प्रक्षेपण।

इस्त्रोने सांगितलं की, श्रीहरिकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये जीएसएलवी-एफ 11 च्या माध्यमातून हे उपग्रह प्रक्षेपित झालं आहे. 26 तासांचा उलटा प्रवास मंगळवारी सुरू झाला आहे. 

जीएसएलवी एफ 11 जीसॅट 7 ए ला जियोसिंक्रोनस ट्रान्सफर आर्बिट (जीटीओ) मध्ये सोडणार आहे. जीएसएलवी -एफ 11 इस्त्रोची चौथी पीढीचं प्रक्षेपण करणार आहे. 

या प्रक्षेपणाला जवळपास 500-800 करोड रुपये लागले आहेत. वायुसेनाला पुढच्या काही वर्षांमध्ये आणखी एक उपग्रह जीसॅट -7 सी मिळण्याची आशा आहे. ज्यामुळे नेटवर्कद्वारे त्याच्या ऑपरेशन्सच्या क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. 

जीसॅट - 7 ए च्या अगोदर इस्त्रोने 29 सप्टेंबर 2013 मध्ये जीसॅट - 7 ला देखील लाँच केलं. जे 'रूक्मिणी' नावाने ओळखले जाते. हे उपग्रह भारतीय नौसेने करता होते.