ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, श्रीहरीकोटा : इस्रोची या वर्षातली श्रीहरिकोटाहून उपग्रह प्रक्षेपणाची पहिली मोहीम दुपारी तीन वाजून दोन मिनिटांनी उपग्रह पार पडली. PSLV C 49 या प्रक्षेपकाद्वारे EOS -01 हा स्वदेशी उपग्रह अवकाशात पाठवला गेलाय. शेती, वन आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रासाठी या उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रांचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर चीनच्या हलचाली या उपग्रहाद्वारे टीपता येणार आहेत.
Watch the launch of #PSLVC49 live from Sriharikota at:https://t.co/MX54Cx57KUhttps://t.co/uiTNFaMWvKhttps://t.co/JtnEW5Q8XG pic.twitter.com/lieuBhBXYX
— ISRO (@isro) November 7, 2020
या मुख्य उपग्रहाबरोबर ल्युथीआना देशाचा एक तर लक्झेंबर्ग आणि अमेरिकेचे ४ छोटे उपग्रह पाठवले जाणार आहेत. याआधी 5 मार्च ची GIAT-01 उपग्रह प्रक्षेपणाची श्रीहरिकोटा इथली मोहीम तांत्रिक बिघाडामुळे पुढे ढकलण्यात आली होती. तर १७ जानेवारीला GSAT30 नावाचा उपग्रह युरोपियन स्पेस एजन्सीच्या मदतीने अवकाशात पाठवला होता. कोरोना संकटामुळे तब्बल ८ महिन्याच्या कालावधी नंतर इस्रो पुन्हा एकदा भारतीय भूमीवरून उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज झाली आहे. अवकाश क्षेत्रात अनेक उल्लेखनीय मोहिमा यशस्वीपणे पार पाडलेल्या इस्रोच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.
इस्रोचं PSLV - C 49 हे प्रक्षेपण यान एकंदर १० उपग्रहांसोबत दुपारी ३ वाजून २ मिनिटांनी अवकाशात सोडलं जाणार आहे. यापैकी भारताचा एक उपग्रह असून, इतर ९ उपग्रह इतर देशांचे आहेत. आज भारताचा EOS-01 हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह, लिथुआनियाचा प्रौद्योगिकी डेमॉन्स्ट्रेटर, लक्समबर्गचे चार मेरिटाईम ऍप्लिकेशन सॅटेलाइट,अमेरिकेचे चार लेमुर मल्टी मिशन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट अवकाशात सोडले गेले. हे सर्व उपग्रह श्रीहरिकोटातल्या सतिश धवन स्पेस सेंटर इथून अवकाशात सोडले गेले.
Watch Live: Launch of EOS-01 and 9 customer satellites by PSLV-49 https://t.co/H4jE2fUhNQ
— ISRO (@isro) November 7, 2020
अवकाशात झेपावणारा एकमेव भारतीय उपग्रह देशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ही अर्थ ऑबजर्वेशन रिसेट सॅटेलाइटचीच विकसित मालिका आहे. यात सिंथेटिक अपर्चर रडार लावण्यात आलाय. कधीही आणि कोणत्याही हवामानात तो पृथ्वीवर नजर ठेवणाराय. ढग असतानाही पृथ्वीची पाहणी करून स्पष्ट चित्रं घेणं, हे या उपग्रहाचं वैशिष्ट्य आहे. सीमांच्या देखरेखीमुळे देशाच्या सुरक्षेसाठी हा उपग्रह अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवाय शेती तसंच आपत्ती व्यवस्थापनासाठी सुद्धा हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे.
या वर्षातलं इस्रोचं हे पहिलंच प्रेक्षपण आहे. तर डिसेंबर महिन्यात PSLV - C50 रॉकेटद्वारे GSAT - 12R कम्युनिकेशन सॅटेलाइट पाठवायची इस्रोची योजना आहे.