'कार्टोसॅट-३'चे यशस्वी प्रक्षेपण, १३ लघु उपग्रहांसहित अवकाशात झेपावला

श्रीहरीकोटा येथून चांद्रयान-२ नंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोचे पहिले मिशन यशस्वी झाले आहे. 'कार्टोसॅट-३ हा १३ लघु उपग्रहांसहित अवकाशात झेपावला आहे. 

Updated: Nov 27, 2019, 11:05 AM IST
'कार्टोसॅट-३'चे यशस्वी प्रक्षेपण, १३ लघु उपग्रहांसहित अवकाशात झेपावला title=

चेन्नई : श्रीहरीकोटा येथून चांद्रयान-२ नंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोचे पहिले मिशन यशस्वी झाले आहे. 'कार्टोसॅट-३ हा १३ लघु उपग्रहांसहित अवकाशात झेपावला आहे. पृथ्वीचे भूपृष्ठीय निरीक्षण आणि उच्च दर्जाची छायाचित्रे टिपणाऱ्या कार्टोसॅट-३ या उपग्रहासह अमेरिकेच्या १३ अन्य व्यावसायिक नॅनो उपग्रहांचे आज सकाळी ९.२८ वाजता यशस्वी प्रक्षेपण झाले. 

या प्रक्षेपणावेळी इस्रोचे प्रमुख के. सिवन श्रीहरिकोटा मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये उपस्थित होते. त्यांच्यासोबत या मिशनचे अभियंता आणि इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते. चांद्रयान २ नंतरचं इस्रोचे हे पहिले यश आहे. या उपग्रहाद्वारे मोठ्या स्तरावर मॅपिंग केलं जात आहे. शहरांचे मॅपिंग या उपग्रहाद्वारे केली जाणार आहे. 

तसेच ग्रामीण भागातील मुलभूत सोयीसुविधांचे व्यवस्थापन करणे या मॅपिंगमुळे शक्य होणार आहे. हा कार्टोसॅट श्रृंखलेतील नववा उपग्रह आहे. दरम्यान, कार्टोसॅट - ३ ला भारताचा डोळा म्हटले जात आहे.   

पीएसलव्ही-सी ४७ मोहिमेच्या 'काऊंटडाऊन'ला मंगळवारी सकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथे सुरुवात झाली होती. पीएसएलव्ही-सी ४७ हा उपग्रहवाहक आपल्या ४९ व्या मोहिमेअंतर्गत १३ नॅनो उपग्रहांसह कार्टोसॅट-३ अवकाशात सोडण्याचे जाहीर करण्यात आले होते.