इस्रो आज एकूण ३१ उपग्रह अवकाशात धाडणार

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आज एकूण ३१ उपग्रह अवकाशात धाडणार आहे. सकाळी ९.२० मिनिटांनी श्रीहरिकोटा या तळावरून PSLV - C - 38 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने ही मोहीम पार पाडली जाणार आहे.

Updated: Jun 23, 2017, 09:08 AM IST
इस्रो आज एकूण ३१ उपग्रह अवकाशात धाडणार title=

मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आज एकूण ३१ उपग्रह अवकाशात धाडणार आहे. सकाळी ९.२० मिनिटांनी श्रीहरिकोटा या तळावरून PSLV - C - 38 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने ही मोहीम पार पाडली जाणार आहे.

नागरी तसंच लष्करी कामांकरता उपयोगी ठरणारा, जमिनीची अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रे घेऊ शकणारा ७१२ किलो वजनाचा Catrosat 2 श्रेणीतील उपग्रह अवकाशात सुमारे ५०५ किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित केला जाणार आहे. याबरोबर तामिळनाडूमधील नूरुल इस्लाम युनिव्हर्सिटीचा १५ किलो वजनाचा NIUSAT या नॅनो सॅटेलाईटही प्रक्षेपित केला जाणार आहे.

ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिली, झेक रिपब्लिक, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, लिथुआनिया, स्लोवाकिया, इंग्लंड आणि अमेरिका अशा एकूण १४ देशांतील विविध विद्यापीठ, वैज्ञानिक संस्था यांचे एकूण ३९ लघू उपग्रह प्रक्षेपित केले जाणार आहेत. इस्रोच्या अत्यंत भरवशाच्या PSLV या प्रक्षेपकाची ही ४० वी मोहीम असणार आहे. जर या मोहिमेत यश मिळाले तर PSLV प्रक्षेपकाचे हे सलग ३८ वे यश असेल.