Job News : घरी जा...; म्हणत शिफ्ट संपल्याची आठवण करून देणारी कंपनी पाहून नेटकरी विचारतायत Vacancy आहे का?

Job News : काम तर सगळेच करतात, पण आपण करतो त्या कामाची समोरच्या व्यक्तीला जाण आहे की नाही हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. या बाबतीतल ही कंपनी पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही.   

Updated: Feb 16, 2023, 09:13 AM IST
Job News : घरी जा...; म्हणत शिफ्ट संपल्याची आठवण करून देणारी कंपनी पाहून नेटकरी विचारतायत Vacancy आहे का?  title=
IT company gave warning to remind employees as their shift timings working hours ends

Job News : गेल्या काही वर्षांपासून (Private sector jobs) खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गाचं आयुष्य काहीसं साचेबद्ध झालं आहे. अमुक इतक्या तासांची नोकरी, त्यातही जास्तीचं काम, (Holidays) सुट्टीच्या दिवशी येणारे फोन या साऱ्यानं अनेकांचंच जगणंही कठीण केलं आहे. पण, कितीही मनस्ताप झाला तरीही काही महत्त्वाच्या गरजांच्या पूर्ततांसाठी आणि मुख्य म्हणजे अर्थार्जनासाठी नोकरीवर टिकून राहण्याचा निर्णय प्रत्येकजण घेत असतो. पण, कामाचा भार मात्र काही केल्या कमी होत नाही. 

तुम्हाला पगार (Salary) ठराविक तासांचा मिळणार पण, तुम्ही मात्र Beyond the limit जाऊन काम करणं अपेक्षित आहे असं अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची निवड करतानाच सांगतात. याचा अर्थ नोकरीच्या Shift Hours पलीकडे जाऊन जास्त तास ऑफिसमध्ये (office) काम कराव लागलं तर ते तुम्ही नाकारू शकत नाही. या एका मुद्द्यावरून दर दिवशी अनेकांच्याच तळपायाची आग मस्तकात जाते. 

कर्मचाऱ्यांना होणारा त्रास, त्यांचा मनस्ताप या साऱ्याची चिंता करणार कोण? असा सवाल विचारणाऱ्यांना आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. कारण, मध्य प्रदेशातील एका कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळं कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. कारण, ही कंपनी चक्क कामाचे तास पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना 'आता घरी जा' असं सांगताना दिसत आहे. 

कोणती कंपनी कर्मचाऱ्यांना घरी पाठवतेय? 

सोशल मीडियावर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार (Madhya Pradesh) मध्य प्रदेशातील SoftGrid Computers या कंपनीत काम करणाऱ्या तन्वी खंडेलवाल या तरुणीनं तिच्या LinkedIn अकाऊंटवरून याबाबतची पोस्ट लिहिली. 

'Warning... तुमच्या कामाचे तास संपले आहेत. ऑफिसची सिस्टीम पुढच्या 10 मिनिटांत बंद होईल. कृपया घरी जा...' असे मेसेज डेस्कटॉप स्क्रिनवर दिसत असतानाचा एक फोटो तिनं शेअर केला. कॅप्शनमध्ये तिनं ही कोणती काल्पनिक किंवा पैसे घेऊन लिहिलेली पोस्ट नसल्याचंही स्पष्ट केलं. आपल्या कंपनीकडून #WorkLifeBalance ला प्राधान्य दिलं जातं असं सांगताना त्यांच्या कंपनीच्या Computer मध्ये अशी व्यवस्था केली आहे जिथं कामाच्या निर्धारित तासांनंतर आपल्याला तशी आठवण करून देणारा एक मेसेज दिसतो असं सांगितलं. 

हेसुद्धा वाचा : Sarkari Naukri : मालामाल व्हा! पोलीस, बँक, आरोग्य; सर्व सरकारी नोकऱ्यांची संधी एका क्लिकवर

थोडक्यात तुम्ही एकदा कामाचे तास पूर्ण केले, की त्यानंतर Office Calls आणि Mails ची कटकट नाही, असं म्हणत किती कमाल आहे ना हे? हा प्रश्न तिनं इतर कर्मचारी मित्रांना केला. इतकंच नव्हे, तर इतक्या सुरेख वातावरणात काम करताना तुम्हाला Monday Motivation ची गरजच नाहीये आणि तुम्ही आठवडा कधी संपतोय याची वाटही पाहणार नाहीत असं म्हणत आपल्या संस्थेकडून कर्मचाऱ्यांची नेमकी कशी काळजी घेतली जाते हे दाखवून दिलं. 

IT company gave warning to remind employees as their shift timings working hours ends

एकिकडे एलॉन मस्क आणि दुरीकडे.... 

तिथे एकिकडे ट्विटरची (Twitter) मालकी हाती आल्यावर कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 80 तास काम करणं अपेक्षित आहे असं म्हणत त्यांच्यावर कामाचा भार वाढवणारा एलॉन मस्क (Elon Musk) आणि दुसरीकडे भारतात कर्मचाऱ्यांना नोकरीपलीकडेही आयुष्य आहे याचीच आठवण करून देणारी एक संस्था पाहायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांची इतकी काळजी करणाऱ्या या company विषयीची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनीच तिथं काम करण्याची संधी मिळेल का अशी विचारणा केली, तर कुणी आम्ही ही पोस्ट आमच्याही Boss ला दाखवतो असं म्हटलं. तुमचं या अनोख्या संकल्पनेबाबत काय मत?