Sarkari Naukri : मालामाल व्हा! पोलीस, बँक, आरोग्य; सर्व सरकारी नोकऱ्यांची संधी एका क्लिकवर

Government Jobs : तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? इथं एक नाही पाच विविध विभागांमध्ये मिळतेय नोकरीची सुवर्णसंधी. आताच पाहा.... 

Updated: Feb 13, 2023, 10:58 AM IST
Sarkari Naukri : मालामाल व्हा! पोलीस, बँक, आरोग्य; सर्व सरकारी नोकऱ्यांची संधी एका क्लिकवर  title=
Sarkari Naukri Job of the Week in bank police health department rad details

Government Jobs : सरकारी नोकरी प्रत्येकालाच हवीहवीशी वाटत असते. पण, प्रत्येकाचं ते स्वप्न साकार होतंच असं नाही. असं असलं तरीही अनेजण खासगी नोकरी हाताशी असतानाही सरकारी नोकरीच्या शोधार्थ प्रयत्न सुरु करतात. तुम्हीही अशा नोकरीच्या शोधात आहात का? विविध विभागांमध्ये अशा नोकऱ्या उपलब्ध आहेत ज्यासाठी तुम्ही अर्ज (Job Application) करु शकता. चला तर मग पाहुया अशा नोकऱ्या नेमक्या कोणत्या विभागात आहेत... 

वैद्यकिय क्षेत्र (Medical Jobs)

वैद्यकिय क्षेत्रामध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी राजस्थानात संधी आहे. येथे मेडिकल एज्युशन सेक्टोरेल पोर्टल राजस्थानमध्ये नोकरभरती सुरु आहे. यासाठी इच्छुकांनी medicaleducation.rajasthan.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. 15 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. 

पोलीस भरती (Police Recruitment 2023)

स्टेट लेवल पुलिस रिक्रूटमेंट बोर्ड (SLPRB) मध्ये कॉन्स्टेबलसाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरु आहे. इथं अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी आहे. या नोकरभरतीविषयीची अधिक माहिती  slprbassam.in  या संकेतस्थळावर मिळेल. 

शिक्षक भरती (Teacher Recruitment 2023)

शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी एक्सीलेंस स्कूल किंवा मॉडल स्कूल येथे नोकरीच्या संधी आहेत. झारखंडमधील शाळांसाठी ही भरती आहे. यासाठी  jamshedpur.nic.in या संकेतस्थळावर इच्छुकांनी भेट द्यावी. तब्बल 157 जागांसाठी ही नोकरभरती आहे. 

हेसुद्धा वाचा : Mukesh Ambani पुन्हा ठरणार तारणहार; थेट 2 रुपयांवर शेअर कोसळलेल्या 'या' कंपनीला मोठा आधार 

नौदल भरती (Navy Recruitment 2023)

आता दहावी उत्तीर्ण इच्छुकांनाही नौदलात नोकरीची संधी उपलब्ध आहे. सिविलियन पर्सनलच्या भरतीसाठी नुकतेच नौदलाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये 248 पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल. 

बँकेतील नोकरी (BOI Recruitment 2023)

बँक ऑफ इंडिया (BOI)कडून प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत.  bankofindia.co.in या संकेतस्थळावरून उमेदवार अर्ज करु शकतात. 25 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरभरतीमध्ये एकूण 500 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्यामध्ये 350 व्हॅकेन्सी जनरल बँकिंग, 150 व्हॅकेन्सी आयटी ऑफिसरसाठी असतील.