ITR FY 2020-21 | पहिल्यांदा IT Return भरताय? जाणून घ्या कोणकोणती कागदपत्र आहेत गरजेची

जर तुम्ही पहिल्यांदा ITR फाइल करणार असाल. तर जाणून घ्या की कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे. जर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र नसतील तर तुम्ही ITR फाइल करू शकत नाही.

Updated: Aug 13, 2021, 03:41 PM IST
ITR FY 2020-21 | पहिल्यांदा IT Return भरताय? जाणून घ्या कोणकोणती कागदपत्र आहेत गरजेची title=

नवी दिल्ली :  इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 वरून वाढून 30 सप्टेंबर 2021 करण्यात आली आहे. जर तुम्ही पहिल्यांदा ITR फाइल करणार असाल. तर जाणून घ्या की कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे. जर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र नसतील तर तुम्ही ITR फाइल करू शकत नाही.

आयटी रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख हळुहळू जवळ येत आहे. 30 सप्टेबर रोजी आयटी रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे. जाणून घ्या

फॉर्म 16 
सर्व नोकरी करणाऱ्या लोकांसाठी फॉर्म 16 हे महत्वाचे कागदपत्र असते. त्याच्या मदतीने आयटीआर फाइल केला जातो. हे कागदपत्र सर्व कंपनींकडून दिले जाते. यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातून टॅक्स कापल्याची संपूर्ण माहिती असते. तसेच दिलेल्या पगाराचीही संपूर्ण माहिती असते. 

फॉर्म 26 एएस
हा फॉर्म आयकर विभागाकडून जारी करण्यात येतो. ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या उत्पन्नावर लावण्यात येणाऱ्या कराविषयी माहिती असते. 

व्याजाचे प्रमाणपत्र
तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये FD केली आहे. तर त्यावर मिळणाऱ्या व्याजाचे प्रमाणपत्र किंवा बँक स्टेटमेंट सोबत ठेवणे गरजेचे आहे. इनकम टॅक्स ऍक्ट आर्टिकल 80 टीटी अंतर्गत 10 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर आकारला जात नाही.

टॅक्स सेविंग गुंतवणूकीचा पूरावा
बहुतांश लोक टॅक्स वाचवण्यासाटी काही टॅक्स सेविंग स्किममध्ये गुंतवणूक करतात. अशा  गुंतवणूकीचा पूरावा देणेही गरजेचे असते.

आरोग्य विमा आणि खर्चाचे कागदपत्र
सेक्शन 80 डी अंतर्गत 25 हजार रुपयांपर्यंत आरोग्यविमा प्रीमियमवर टॅक्स सूट मिळण्यास क्लेम करू शकता.